फलटण: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज आसू (तालुका फलटण) येथे दिवंगत दादाराजे खर्डेकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन खर्डेकर कुटुंबाचे सांत्वन केले
सातारा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व संचालक दादाराजे खर्डेकर यांचे नुकतेच दुःखद निधन झाले त्यामुळे खर्डेकर कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आज खासदार शरद पवार यांनी आसू, तालुका -फलटण येथील खर्डेकर यांच्या निवासस्थानी जाऊन दादाराजे यांचे सुपुत्र पंचायत समितीचे उपसभापती शिवरूपराजे खर्डेकर व कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले यावेळी बोलताना खासदार शरद पवार यांनी दादाराजे खर्डेकर यांच्याशी आपले वैयक्तिक व घरगुती संबंध होते मलाच ते पक्ष म्हणून मानत असत नेहमी त्यांनी मला साथ दिली.
अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या दादाराजे खर्डेकर यांनी जिल्हा बँकेत अत्यंत उत्तमरित्या काम केले बँकेचा नावलौकिक वाढविला दादाराजे यांच्या निधनाने सहकार क्षेत्राची हानी झाली आहे.
त्यांच्या कुटुंबियाच्या पाठीशी ठामपणे आपण उभे राहू अशी ग्वाही दिली दरम्यान शरद पवार येण्याअगोदर कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही खर्डेकर कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.
खा.शरद पवार यांनी खर्डेकर कुटुंबियांची भेट घेऊन केले सांत्वन
RELATED ARTICLES