Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीखा.उदयनराजेंनी केले दादाराजे खर्डेकर यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

खा.उदयनराजेंनी केले दादाराजे खर्डेकर यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

फलटण: स्व.श्रीमंत दादाराजे खर्डेकर हे सातारा जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते व त्यांनी राजकारणात जंटलमन अशी ओळख निर्माण केली होती. ते आमच्या छत्रपती घराण्याची सतत आपुलकीचं नातं जपणारे व आमच्या घराण्याचे प्रेरणास्थान होते असे प्रतिपादन खा. उदयनराजे भोसले यांनी केले.
दरम्यान, फलटण तालुक्यातील काही मंडळींनी त्यांचा राजकारणासाठी उपयोग करून घेतला. दादाराजे सारख्या निष्ठावंत नेत्याला खाली खेचण्याचे काम इथल्या काही मंडळींना केल्याची टीकाही त्यांनी केली. आसू, ता. फलटण येथेल दादाराजे खर्डेकर यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आसू येथे खा. उदयनराजे आले होते. माजी शिक्षण सभापती सुनील काटकर यावेळी उपस्थित होते .
माझे वडील प्रतापसिंह महाराज गेल्यानंतर आमच्या घराण्यावर खूप मोठा आघात झाला होता. शिवरूपराजे हे माझ्यापेक्षा खूप लहान होते, शिवरूपराजे यांच्यापेक्षा माझ्यावरती त्यांनी खूप प्रेम केले.शिवरूपराजे यांच्यावरती मी अन्याय होऊ देणार नाही. जिल्हा बँकेत चेअरमन होण्यासाठी दादाराजे यांना अनेकांनी विरोध केला होता.
परंतु दादाराजे यांच्यासाठी मी हट्ट धरला व त्यांनी तीस वर्ष केलेल्या कामाची त्यांना ठिकाणी पावती मिळाली. दादाराजे यांनी आयुष्यात कुठलीही अपेक्षा केली नाही सतत दादाराजेंच्या पश्चात त्यांचे सुपुत्र श्रीमंत खर्डेकर यांच्या पाठीमागे ताकद उभा करून त्यांना जिल्हा बँकेच्या संचालक मंडळामध्ये संधी मिळण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तालुक्यातील काही महाभागांनी दादाराजे खर्डेकर यांचे राजकीय खच्चीकरण केले. जनतेने त्या पापी लोकंना त्यांची जागा दाखवली पाहिजे हीच दादाराजे यांना खरी भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल , अशी उपहासात्मक टीका कोणाचे नाव न घेता खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular