Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीसुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी कारवाई

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी कारवाई

फलटण: सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी संबंधित वाहन चालक/मालक यांच्यावर कारवाई करावी असा आदेश देण्यात आला. या वरून सातारा जिल्हा जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात सूचना दिल्या असल्याने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याने आज ग्रामीण भागातील डीजेच्या सहा गाड्या वाहने सील केली असून आगामी गणेशोत्सव साजरा करीत असताना लोकांना या कर्कश्य आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.
उद्या पासून गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे या मुळे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी या कालावधीत अनेक वाहनांमध्ये विनापरवाना बदल करून त्या वाहनात मोठे साऊंड सिस्टीम बसऊन कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता मोठ्या आवाजात लावून लोकांना त्रास होतो या मुळे फलटण ग्रामीण पोलिसांनी हे त्या संबंधित वाहन चालक/मालक यांच्या थेट घरी जाऊन पुढील दहा दिवसही वाहने सील केली आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular