फलटण: विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी येणार्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या गटाची राजकीय भूमिका जाहीर करण्याच्या दृष्टीने शुक्रवार दि.13 रोजी येथील अनंत मंगल कार्यालय येथे सकाळी 11 वाजता कार्यकर्ता मेळावा बोलावला असून ते कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार याकडे जिल्ह्याच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
गेली अनेक दिवस राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्ह्याचे जेष्ठ नेते व विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे छ. खा.उदयनराजे भोसले यांना आवरा नाहीतर आम्हाला निर्णय घ्यावा लागेल असा थेट सवाल करून शरद पवार यांनाच आव्हान दिले होते. यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये नाराज असल्याचे दिसून येत होते, यानंतर श्रीमंत रामराजे हे राष्ट्रवादी काँग्रेसला सोडणार अशी चर्चा संपूर्ण राज्यात रंगली होती.
परंतु आजअखेर कोणताही निर्णय घेतला नसल्याने या मेळाव्याकडे सर्वांचेच लक्ष केंद्रित झाले असून ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर भाजप मध्ये जाणार का?शिवसेनेत जाणार का?आहेत इथंच राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये राहणार या बाबत अनेक तर्कवितर्क व चर्चा सातारा जिल्ह्यात सुरू असून भाजपमध्ये जाण्यासाठी ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर उत्सुक होते मात्र खासदार छ. उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून व माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी तर भाजपमध्ये प्रवेश केल्याने ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला आहे तर भाजपमध्ये एका गटाचा ना.श्रीमंत रामराजे यांच्या प्रवेशासाठी विरोध असल्याची चर्चा सुरू आहे, तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे व ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे संबंध चांगले असून पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेचे प्राबल्य सुद्धा आहे मात्र कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात त्या तुलनेत पावरफुल नेता मात्र शिवसेनेकडे नाही या मुळे ना.श्रीमंत रामराजे यांना शिवसेनेत प्रवेश देऊन एक पावरफुल नेता म्हणून सुद्धा शिवसेनेत प्रवेश करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एका दगडात दोन पक्षी मारणार का?अशी चर्चा सुरू आहे.
यामुळे ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर नेमकी कोणती भूमिका घेणार या कडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष या कार्यकर्ता मेळाव्याकडे लागले आहे.
ना.रामराजेंच्या कार्यकर्ता मेळाव्याकडे जिल्ह्याचे लक्ष शुक्रवारी ना.रामराजे नेमकी कोणती भूमिका घेणार?
RELATED ARTICLES