फलटण: येथील कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग कार्यालय यांच्या कार्यालयाच्या विरोधात तहसीलदार कार्यालयाच्या समोर सेवानिवृत्त कर्मचारी यांची चौकशी होण्यासाठी दि 16 पासून माणिक दत्तात्रय गवळी हे आत्मदहन करण्याचा इशारा देत आमरण उपोषणास बसले आहेत.
याबाबत निवेदनात दिलेली माहिती अशी की, उपोषणकर्ते माणिक दत्तात्रय गवळी यांनी पाटबंधारे कार्यालय फलटण येथील सेवानिवृत्त कर्मचारी मानसिंग किसन पिसाळ यांनी महाराष्ट्र शासनाची फसवणूक केलेबाबत चौकशी होणेसाठी माहिती अधिकारात संबंधित विभागाकडे अर्ज दाखल करूनही सेवानिवृत्त कर्मचारी पिसाळ यांची जाणीवपूर्वक कोणत्याही प्रकारची चौकशी केली नाही. मानसिंग पिसाळ हे पाटबंधारे कार्यालयात कार्यरत असताना सदर कर्मचार्यांचा बारामती 2007 रोजी अपघात झाला होता त्यानंतर पिसाळ यांनी बारामती येथील न्यायालयात अपघात भरपाईसाठी बारामती न्यायालयात दावा दाखल करून न्यायालयात खोटी माहिती देऊन अपघातामुळे सक्तीच्या रजेवर जावे लागले असे सांगत खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असल्याचा खोटा उल्लेख करून संबधित डॉक्टरांकडून खोटे सर्टिफिकेट मिळवून शासनाकडून रकमा वसूल करूनही उपोषणकर्ते यांच्याकडूनही खर्च मागणी केलेली आहे.
सदर सेवानिवृत्त कर्मचारी यांनी शासनाची फसवणूक केली आहे का? या बाबत माहिती घेण्यासाठी उपोषणकर्ते यांनी 2007 पाडून अर्ज दाखल केला होता 2007 पासून किती किती झाली आहे,त्यांना किती वेतन अदा केली आहे. अपघातानंतर किती रक्कम वसूल केल्या आहेत व त्या केव्हा केव्हा केल्या आहेत याबाबतची संबंधित विभागाने उपोषणकर्ते गवळी यांना कोणतीही माहिती दिली नसल्याने उपोषणकर्ते गवळी यांनी दि 16 पासून तहसील कार्यालयाच्या बाहेर पाटबंधारे कार्यालयाच्या निषेधार्थ आमरण उपोषण व आत्मदहन करण्याचे निवेदन देऊन आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
पाटबंधारे कार्यालयाच्या निषेधार्थ आमरण उपोषण
RELATED ARTICLES