फलटण: गणपती विसर्जनाची मिरवणूक बघण्यासाठी आलेल्या नागरिकांना पोलिसांनी विनाकारण मारहाण केल्याची घटना घडली होती त्याच्या निषेधार्थ फलटण शहरातील गणेश मंडळांनी आज सातारा येथे महाजनादेश यात्रे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.
गजानन चौक, जबरेश्वर मंदिर व राममंदिर, श्रीराम चौकी व येथुन निघते यावेळी मिरवणूक बघण्यासाठी अचानक पणे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे व पोलीस निरीक्षक प्रताप पोमन, पोलीस उपनिरीक्षक दळवी कर्मचारी व ईतर पोलीस कर्मचारी यांनी गणेशोत्सव मिरवणूक बघणार्या नागरिकांना अमानुषपणे मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानकपणे लाठीमार होत असल्याने त्याठिकाणी लहान मुले, महिला व पुरुष तसेच वयोवृद्ध नागरिकांची धांदल उडाली व चेंगराचेंगरी झाली होती.
या मारहाणीत अनेक लहान मुले, युवक, महिला जखमी झाल्या होत्या या घटनेच्या निषेधार्थ फलटण मधील गणेशोत्सव मंडळांनी आज सातारा येथे महाजनादेश यात्रे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झालेल्या घटनेची माहिती देऊन विनाकारण झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ निवेदन दिले आहे. सदर निवेदनात मारहाण करणार्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. जबाबदार पोलीस कर्मचारी यांच्यावर योग्य कडक कारवाई न झाल्यास मोठे आंदोलन उभे करण्यात येणार असल्याचा इशारा गणेशोत्सव मंडळानी दिला आहे.
‘त्या’ घटनेच्या निषेधार्थ फलटणमधील गणेशोत्सव मंडळांनी दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन
RELATED ARTICLES