Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीस्वप्नाली शिंदे यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून फलटणमधील महिलांना मिळणार मोफत प्रशिक्षण

स्वप्नाली शिंदे यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून फलटणमधील महिलांना मिळणार मोफत प्रशिक्षण

फलटण: महाबळेश्वर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा व सिताई फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा स्वप्नाली कुमार शिंदे यांच्या अभुतपुर्व आणि नाविन्यपुर्ण संकल्पनेतुन फलटण तालुका आणि परिसरात हजारो महिलांना विविध कला गुणांनाची मोफत प्रशिक्षणे देण्यात आली आहेत.
आपल्या तालुक्यातील महिला माता भगिनींनी स्वतः शिकुन तसेच काही अंशी प्रशिक्षण घेवुन या वर आधारीत जवळपास 200 खाद्य पदार्थ व विविध वस्तुंचे भव्य प्रदर्शन व विक्री (खाद्य महोत्सव) फलटण येथे पिरँमिड चौक दि. 18 रोजी सकाळी 10.00 ते रात्रौ10.00 या वेळेत आयोजित केलेला आहे.सिताई फौंडेशनच्या अध्यक्षांच्या संकल्पनेतून फलटणच्या सर्व महिला भगिनींना हे ऐतिहासिक व्यासपीठ मिळवून देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. या सर्वांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसिद्ध सिनेआभिनेत्री मानसी नाईक यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे. तरी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहुन आपल्या सर्व महिला उद्योजकांना प्रेरणा प्रोत्साहन द्यावे व विविध खाद्यपदार्थांचा कुटुंबासहीत अस्वाद घेण्याचे अवाहन शिंदे यांनी केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular