फलटण: फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनीरिंग फलटण येथे दि.20 सप्टेंबर 2019 रोजी कुरुक्षेत्र 2019 या राज्यस्तरीय टेक्निकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये मिळून एकूण 21 स्पर्धा प्रकार होणार असून, सुमारे एक हजार स्पर्धक या स्पर्धेत भाग घेणार आहेत. या स्पर्धेचे हे सलग सहावे वर्ष आहे.
सातारा जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील इतर इंजिनीअरिंग कॉलेजमधील विध्यार्थी स्पर्धक या स्पर्धेमध्ये भाग घेत असतात. या स्पर्धेचे ब्रिदवाक्य बॅटल ऑफ ब्रेन हे असून खरोखरच ही स्पर्धा म्हणजे बुद्धिवाद्यांमधील एक युद्धच समजले जाते. इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये टेक्निकल स्किल्स रुजवण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा मदत करतात. या स्पर्धा प्रकाराच्या अंतर्गत इयत्ता बारावीतील विद्यार्थ्यांची वस्तुनिष्ठ परीक्षा त्यांच्या महाविद्यालयांमध्ये जाऊन घेण्यात आली.
जवळपास सहाशे विद्यार्थी या परीक्षेत बसले होते. प्रत्येक महाविद्यालयातील प्रथम तीन क्रमांक मिळवणार्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसमवेत यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे. ज्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये हि परीक्षा आली त्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा कार्यक्रमाच्या उदघाटनावेळी सन्मान करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या युगामध्ये परीक्षा देणारे इंजिनियर तयार करण्यापेक्षा नवनिर्मिती करण्याची क्षमता असणारे इंजिनियर घडवण्यासाठी कुरुक्षेत्र स्पर्धा उपयोगी ठरेल त्यामुळे सर्व डिप्लोमा व डिग्री इंजिनिअरिंग करणार्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपला कौशल्य विकास करून घ्यावा अशी आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम के फडतरे यांनी केले. तसेच वाढत्या औद्योगिक करण्यासाठी आवश्यक असणारे विकसित मनुष्यबळ घडवण्यासाठी ही स्पर्धा नक्कीच मदत करेल असे प्रतिपादन संस्थेचे सेक्रेटरी, तथा सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन दि.20 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता सेमिनार हॉल, कॉलेज ऑफ इंजिनीरिंग फलटण याठिकाणी सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर सर्व स्पर्धा प्रकार सुरू होणार असून सायंकाळी पाच वाजता बक्षीस वितरण कार्यक्रम होणार आहे. बाहेरून येणार्या स्पर्धकांसाठी मोफत बस व्यवस्था व जेवण व्यवस्था केलेली आहे. बस फलटण बसस्थानकासमोरील रिंग रोड येथून निघून कॉलेज वरती येणार आहे, याची नोंद सर्व स्पर्धकांनी घ्यावी. या कार्यक्रमासाठी फलटण तालुक्यातील सर्व पत्रकार बंधु तसेच लायन्स क्लब फलटण, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया फलटण, क्रेडाई फलटण या सामाजिक संस्थांच्या सर्व पदाधिकार्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच कॉलेज ऑफ इंजिनीरिंग फलटण सामंजस्य करार असणार्या सर्वच इंडस्ट्रीच्या पदाधिकार्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले असून या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.
फलटण येथे शुक्रवारी ‘कुरुक्षेत्र 2019’ राज्यस्तरीय टेक्निकल स्पर्धेचे आयोजन
RELATED ARTICLES

