Tuesday, December 2, 2025
Homeठळक घडामोडीआज विडणी येथे शाळा बंद व धरणे आंदोलन

आज विडणी येथे शाळा बंद व धरणे आंदोलन

फलटण: विडणी येथील उत्तरेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये पूर्णवेळ शिक्षक नसल्यामूळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने ग्रामस्थांच्यावतीने उद्या शुकवार रोजी शाळा बंद व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
विडणी (ता.फलटण) येथे महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीचे उत्तरेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज असून या विद्यालयाची स्थापना1972 साली झाली असून या शाळेतून हजारो विद्यार्थांनी शिक्षण घेऊन आपले भविष्य घडविले आहे, विडणी गाव फलटण तालुक्यात सर्वात मोठे लोकसंख्येचे व विकसनशील गाव म्हणून परिचित आहे. या गावात उत्तरेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ही खासगी शिक्षण संस्था आहे या शाळेत सध्या इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत सुमारे 650 मुले मुली शिक्षण घेत असून त्यांना शिकवण्यासाठी 19 शिक्षकवर्ग आहेत,परंतू वयोमर्यादानुसार 9 शिक्षक सेवानिवृत्त झाले असून त्यांच्याजागी संस्थेने तात्पुरत्या स्वरुपात रिक्त शिक्षकांची पदे भरली असून यांची नेमणूक करून जवळपास 5 वर्ष होऊन गेली असून त्यांना शासनमान्य नेमणूकीचे पत्र मिळाले नसल्याने व त्यांना बिनपगारीच काम करावे लागत असल्याने त्यांची विद्यार्थ्याना पूर्णवेळ शिकवण्याची मानसिकता न राहिल्याने ते आपल्या सोईनुसारच कधीतरी येऊन शिकवत असतात त्यामूळे शाळेतील विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान अतोनात होऊ लागल्याने मुलांनी आपल्या पालकांना तक्रार केल्याने पालक संस्थेच्या व्यवस्थापना कडे चौकशी करण्यास गेले असता त्यांना अनेकदा व्यवस्थापनाने खोटे नाटे बोलून पालकांची दिशाभूल अनेक महिने केली गेली.
शेवटी पालकांनी व ग्रामस्थांनी संस्थेच्या गैरकारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त करत उद्या शुकवार दिनांक 20 रोजी सकाळी 9 वाजता उत्तरेश्वर विद्यालयात विडणी गावातील ग्रामस्थ व पालक यांच्या वतीने शाळा बंद व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular