Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीदिगंबर आगवने यांच्या भुमिकेबाबत उत्सुक्ता

दिगंबर आगवने यांच्या भुमिकेबाबत उत्सुक्ता

फलटण: स्वराज संघटनेचे अध्यक्ष व युवा नेते दिगंबर आगवणे यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन फलटण येथे करण्यात आले असून माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर या मेळाव्यात अध्यक्षपद भुषविणार आहेत.
बुधवार दि. 25 सप्टेंबर रोजी शुभारंभ लॉन्स, बिरदेव नगर येथे सायंकाळी पाच वाजता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. फलटण विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने पुढील राजकीय दिशा ठरविण्यासाठी व अगामी काळात कार्यकर्त्यांना विचारात घेऊन त्यांची भुमिका जानून घेण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
अगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील नेते मंडळींनी आपली राजकीय भुमिका अद्याप गुलदस्त्यात ठेवली असल्याने आपणास नेमके कोणत्या पक्षाचे काम करावे लागणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये अद्याप उत्सुक्ता आहे, त्यामुळे आगवने यांनी घेतलेल्या या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये कोणता निर्णय होणार किंवा कुठली भुमिका घेणार याची उत्सुक्ता तालुक्यात सर्वांना लागून राहिली आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular