Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीफलटण येथील अपहरण प्रकरणातील फरार आरोपीस अटक

फलटण येथील अपहरण प्रकरणातील फरार आरोपीस अटक

फलटण: फलटण येथिल डॉ.संजय राऊत अपहरण प्रकरणातील फरारी आरोपीस अटक करण्यात आली आहे.
याबाबत, फलटण शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फलटण शहर पोलीस ठाणे गु.र.नं.70/19 भादवि कलम 364,395,34 वगैरे मधील आरोपी नामे किशोर रामचंद्र आवारे रा.मंगळवार पेठ, फलटण हा गेले सहा महिन्यापासून फरारी होता. त्याच्याविरुद्ध सीआरपीसी क.82 प्रमाणे जाहिरनामा काढण्यात आला होता. त्याला ऑलआउट ऑपरेशन दरम्यान मिळालेल्या बातमीवरुन ताब्यात घेवून अटक करण्यात आला आहे.
सदर आरोपी हा डॉ.राउत अपहरण गुन्हयामधील आहे. त्याने गुन्हा घडण्यापूर्वी सदर रोडची रेकी केली होती.हा 6 महिन्यापासून पोलीसांना गुंगारा देत होता. पोलीस उपनिरीक्षक बनकर व पोलीस उपनिरीक्षक देसाई व पोलीस कॉ.दत्तात्रय नाळे यांच्या पथकाने त्याला कोळकी रोडवर ताब्यात घेतले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular