फलटण: फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातुन महायुतीतील मिञपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांना जागा सुटल्याने अनपेक्षितरित्या दिपकभाऊ निकाळजे यांचे नाव पुढे आल्याने प्रमुख इच्छुकांचा हिरमोड झाल्याने ते अपक्ष निवडणुक लढविण्याच्या तयारीत असुन फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात अपक्षा मध्येच बहुरंगी लढत होणार असुन या लढतीकडे संपुर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
तथापि फलटण मतदारसंघात कोणता झेंडा घेऊ हाती अशी अवस्था नेत्यांचीच झाली आहे यामुळे नेते कार्यकत्यांना कोणता कानमत्र देणार तर कार्यकर्ते नेमके कोणत्या मुद्द्यावर सामान्य जनतेपर्यंत पोहचणार अशी स्थिती निर्माण झाली असुन पक्षापेक्षा अपक्षांची रेलचेल होणार असुन आपपक्षांच्या लढतीत पक्षवाले घायाळ होणार आहेत.
लोकसभा निवडणुकीमध्ये सातारा जिल्ह्यातील माण आणि फलटण यांचा समावेश असल्याने माढा लोकसभा मतदारसंघ देशात गाजला.
तर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आरक्षित असलेला फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ गाजणार याची चिन्हे निवडणुकीपुर्वी निर्माण झाली असुन या लढतीकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले असुन विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपले पत्ते ओपन न केल्याने विद्यमान आ.दिपक चव्हाण हे नेमक्या कोणत्या पक्षातुन निवडणुकीला सामोरे जाणार तर त्यांचे पारंपारिक विरोधी उमेदवार दिगंबर आगवणे यांना महायुतीतील रासप,रयत क्रांती या मिञ पक्षाकडुन तिकीट मिळणार अशी अटकळ बांधली असताना ही जागा रिपाईला गेल्याने त्यांची फार मोठी गोची झाली.तर महाबळेश्वरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा स्वप्नालीताई शिंदे यांनी गेली अनेक दिवस फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील गावनागाव,वाडीवस्तीवर आपल्या सिताई फौडेशनच्या माध्यमातुन जोरदार एन्ट्री मारीत महायुतीकडुन मीच उमेदवार आहे असे सांगत प्रचारामध्ये खुप मोठी आघाडी घेतली होती.
माञ त्यांना महायुतीकडुन तिकीट न मिळाल्याने यांनीही अपक्ष निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.माञ श्रीमंत रामराजे हे 1995 प्रमाणे आपला उमेदवार अपक्ष लढणार तर दिगंबर आगवणे व स्वप्नाली शिंदे या तीनही अपक्ष उमेदवारांमध्ये जोरदार लढत होणार असुन यामध्ये पक्षाने उभे केलेले सर्वच उमेदवार कितव्या नंबरवर राहणार याची उत्कंटा फलटणकरांना लागुन राहिली आहे.
फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात अपक्षामध्येच बहुरंगी लढत
RELATED ARTICLES