Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीबालकवयित्री रुपल पाटोळेचे आकाशवाणीवर काव्यवाचन

बालकवयित्री रुपल पाटोळेचे आकाशवाणीवर काव्यवाचन

फलटण: येथील बालकवयित्री कुमारी रुपल राजेश पाटोळे हिच्या काव्यवाचनाचे नुकतेच सातारा आकाशवाणीवर रेकॉर्डिंग झाले. कु.रुपल ही येथील प्राथमिक शिक्षक राजेश पाटोळे यांची कन्या असून ती सध्या कमला निंबकर बालभवन या शाळेत इयत्ता दहावी मध्ये शिकते. गेल्याच वर्षी तिचा चांदणं हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला असून त्याला तीन पुरस्कारही मिळाले आहेत.
काव्यवाचन व मुलाखत असे या कार्यक्रमाचे स्वरूप असणार असून सातारा एफ. एम. वाहिनीवर क कमाल ध धमाल या लहान मुलांच्या कार्यक्रमात तो रविवार दि.6 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजता प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाचे पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 9.00 वाजता होणार आहे. रुपलच्या या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular