फलटण: फलटण विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी एकूण 18 उमेदवारांनी 21 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी जगताप यांनी सांगितले आहे.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दीपक प्रल्हाद चव्हाण यांनी प्रथम ग्राम दैवत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिर येथे आशीर्वाद घेऊन जोरदार शक्ती प्रदर्शन करीत शहरातील सर्व भागातून रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जेष्ठ नेते सुभाषराव शिंदे, दिलीपसिंह भोसले, बाळासाहेब सोळसकर व मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते. तसेच महायुतीचे उमेदवार दिगंबर रोहिदास आगवणे व अपक्ष दोन असे आगवणे यांनी (एकूण तीन अर्ज) प्रमुख कार्यकर्त्यांसह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांचे समवेत सातारा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ना.सदाभाऊ खोत, खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर व माजी आमदार जयकुमार गोरे उपस्थित होते.
तसेच शिवसेनेकडून डॉ.महेंद्र विठ्ठलराव जगताप, वंचित बहुजन आघाडी यांचेकडून अरविंद बाबुराव आढाव व बहुजन समाजवादी पार्टीचे उमेदवार प्रेम सुरेश मोरे, अमोल आबाजी पवार प्रजासत्ताक भारत पक्ष यासह डॉ.प्रवीण तुळशीराम आगवणे यांनी भारतीय जनता पार्टी व अपक्ष असे दोन अर्ज दाखल केला आहे. कु. कांचन कन्होजा धोंडीराम खरात, विकास श्रीरंग काकडे, चंद्रकांत अंबर अहिवळे, उमाकांत उर्फ कालिदास कोंडीबा कांबळे, जयश्री दिगंबर आगवणे, प्रशांत वसंत कोरेगावकर, अमोल अरुण पाटोळे, अमोल मधुकर करडे, पांडू समुद्रलाल अहिवळे, नंदू संभाजी मोरे, चंद्रकांत नारायण साळवी या अपक्षांसह 18 जणांनी 21 असे एकूण अर्ज दाखल केले आहेत. या सर्वांनी समर्थकांसह येत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला या मुळे आत्तापर्यंत 18 एवढ्या उमेदवारांनी 21 अर्ज दाखल केले आहेत. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यामुळे आपला पक्ष कोणता व आपला उमेदवार कोण हे पाहण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता होती ती आज अखेर पूर्ण झाली आहे.
मात्र फलटण शहर व तालुक्यात सर्वात चर्चेच्या ठरलेल्या महाबळेश्वरच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांना महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्याने त्या कोणती भूमिका घेणार याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते परंतु त्यांनी अपक्ष लढण्याऐवजी थांबणे पसंद केले. 7 तारखेला माघारी घेण्याचा अखेरचा दिवस असून या दिवशी दुपारी 3 नंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
फलटणमध्ये 18 उमेदवारांचे 21 अर्ज दाखल
RELATED ARTICLES