फलटण: महाआघाडी तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ.दीपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ खा.डॉ.अमोल कोल्हे यांची जाहीर सभा आज बुधवार दि.16 रोजी दुपारी 3 वाजता डेक्कन चौक फलटण येथे आयोजित केली असून या जाहीर सभेसाठी विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, आ.दीपक चव्हाण उपस्थित राहणार असून सर्वांनी या जाहीर सभेला यावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद नेवसे यांनी केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या प्रचाराला शेवटचा आठवडा राहिला असून प्रत्येकच पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रचार करीत आहेत, या मध्ये आज बुधवार दि.16 रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची मालिका सुरू करून या महाराष्ट्राच्या भूमीला त्यांचा ऐतिहासिक इतिहास दाखवणारे व छत्रपती संभाजी महाराज यांचे आजोळ असलेल्या ऐतिहासिक फलटण नगरीत खा.डॉ.अमोल कोल्हे येणार असल्याने युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून त्यांनी राजकारनात एक वेगळी छाप पाडली असून त्यांची सभा म्हणजे साक्षात छत्रपती संभाजी महाराज या आपल्या आजोळी अवतरणार असून ते भाजपा शिवसेना व महायुती बाबत आगपाखड करतात.यामुळे त्यांच्या सभेला युवा पिढी येते यामुळे ते मागे एका खाजगी कार्यक्रमात फलटण येथे सहभागी झाले होते, त्यानंतर त्यांनी खासदार झाल्यावर पहिल्यांदाच फलटण मध्ये येत आहेत.
या सभेला युवा नेते श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, व श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर हेही उपस्थित राहणार आहेत.
खा.डॉ.अमोल कोल्हे यांची फलटण येथे आज जाहीर सभा
RELATED ARTICLES

