Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीमुसळधार पावसामुळे मांडवखडकचा पूल वाहून गेला

मुसळधार पावसामुळे मांडवखडकचा पूल वाहून गेला

फलटण: गेले आठवडाभर फलटण तालुक्यातील डोंगर माथा व पायथ्याशी मुसळधार पाऊस पडत असून प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे फलटण उपळवे मार्गावरील मांडवखडक येथील पूल वाहून गेला आहे तर फलटण व मलठण ला जोडणारा वेलणकर दत्त मंदिर ते मलठण (बाणगंगा नदीवरील) जोडणारा पूल पुरामुळे खचला असून फलटण ते साखरवाडी रोड वरील फडतरवाडी येथील पूल ही वाहून गेला आहे.
गेली अनेक दिवस फलटण शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊल पडत असून फलटण तालुक्याची आजपर्यंत ची पाऊसाची सरासरी तोडून त्याच्या दीडपट पाऊस झाला आहे.
मात्र एका बाजूला दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाऊस पडला हे ठीक असले तरी दुसर्‍या बाजूला बाजरी, जनावरांचा चारा, द्राक्षे, डाळिंब व नुकत्याच केलेल्या उसाच्या लागणी मध्ये पाणी जाऊन शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
तर फलटण मधील कसबा पेठेतील एका घराची भिंत कोसळली असून सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही, तर आसू,गिरवी, बरड, आदर्की, सांगवी या भागातील शेतकर्‍यांचे खूप नुकसान झाले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular