फलटण: कोळकी येथील बुवासाहेब मंदिरा समोरील मुतारीमध्ये दारूच्या बाटल्यांचा खच पडला असून मंदिरा शेजारील परिसर म्हणजे तळीरामांचा अड्डा बनला असून या तळीरामांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
फलटण शिंगणापूर, दहिवडी मार्गावर कोळकी येथील बुवासाहेब मंदिरासमोर असलेल्या मुतारीमध्ये अक्षरशः दारूच्या बाटल्यांचा खच पडला असून तो उचलून ती मुतारी स्वच्छ करण्यासाठी ग्रामपंचायत यांनी त्या मुटरीची व तेथील आसपासच्या जागेतील वाढलेल्या काटेरी व इतर झाडांची स्वच्छता करावी व त्या भागातील तळीरामांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी फलटण शहर पोलीस ठाण्यातिल अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न करावेत तसेच हॉटेल चे माहेरघर असलेल्या कोळकी येथील दारू व्यवसायकांना या बाबत सूचना देऊन अशा तळीरामांचा छडा लावण्यासाठी त्यांची माहिती पोलीस ठाण्यात द्यावी अशा सूचना करण्यात यावी अशी मागणी भाविक भक्तांनी केली आहे.
कोळकी येथील मंदिर परिसर बनला तळीरामांचा अड्डा
RELATED ARTICLES