Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीमहेश शिंदेनी शिवबंधन बांधले; कोरेगाव मधुन शिवसेनेची उमेदवारी

महेश शिंदेनी शिवबंधन बांधले; कोरेगाव मधुन शिवसेनेची उमेदवारी

पुसेगाव: युतीचे घोंगडे कोरेगावच्या जागेवरून अडले होते गेले पाच वर्षापासून विधानसभेची भाजपातुन उमेदवारीची तयारी करणार्‍या महेश शिंदे यांनी मातोश्रीवरती शिवसेना पक्ष प्रमुखंाच्या हस्ते शिवबंधन बांधुन शिवसेनेत प्रवेश केला.लोकसभेला सातारा पॅटर्न प्रमाणे भाजपातील आयात उमेदवार महेश शिंदे धनुष्यबाणाच्या चिन्हावरती विधानसभेला उभे राहणार असुन शिवसेनेतील इच्छुक उमेदवार निष्ठावंत उपजिल्हा प्रमुख प्रताप जाधव आणि युवासेनेचे रणजित भोसले यांना शांत राहुन आता महेश शिंदेचे काम करावे लागणार असल्याने येणारी विधानसभा निवडणुक रंगतदार होणार असुन आमदार शशिकांत शिंदे यांचे कडवे आव्हाण शिवसेनेचे नवनिर्वाचित शिवसैनिक महेश शिंदे कसे पेलणार हे पाहावे लागणार आहे.
गेल्या दोनतीन वर्षापासुन अनेक ग्रामपंयाचतीमध्ये भाजपचा झेंडा फडकवणार्‍या महेश शिंदे यांनी भाजपाचा दबदबा निर्माण करताना विद्यमान आमदारांना थेट अंगावर घेत वातावरण निर्मीती केली. जिहे कठापुर योजनेला नाव केाणाचे द्यायचे यावरून शिवसेनेशीही संघर्ष करणार्‍या महेश शिंदे यांना आता भगवा खांद्यावर घ्यावा लागला आहे. महेश शिंदे यांच्या प्रवेशाने शिवसेना निश्‍चितच आव्हाण उभी करण्यात यशस्वी होईल.
विद्यमान आमदार शशिकांत शिंदे यांची मतदारसंघात ताकद मोठी आहे. एकास एक उमेदवार मिळाल्यास शशिकांत शिंदे यांचे आव्हाण रोखता येईल. माणचे आमदार जयकुमार गोरे,सातारचे शिवेंद्रराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेश आणि किशोर बापु बाचल यांचा शिवसेना प्रवेश त्यामुळे महेश शिंदे यांना मोठेपाठबळ मिळणार असुन जुन्या,नव्या शिवसैनिकांची साथ,भाजपाच्या कार्यकत्यार्ंचे प्ररिश्रम आणि नियोजनबध्द प्रचार यंत्रणा राबवल्यास कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनाचा आमदारा निवडुण येण्यास काहीच अडचण नाही असे मत राजकीय जाणकार व्यक्त करतात.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular