Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीसेवागिरी रथोत्सवला लोटला लाखोंचा भक्तसागर

सेवागिरी रथोत्सवला लोटला लाखोंचा भक्तसागर

सेवागिरींच्या नामघोषाने दुमदूमली सुवर्णनगरी
पुसेगाव : संपूर्णपणे महाराष्ट्रासह, गुजरात, कर्नाटकातील भाविकांचे श्रध्दास्थान असणारे पुसेगाव सुवर्ण नगरीचे श्री सेवागिरी महाराजांच्या रथोत्सवाला लाखोंचा जनसागर लोटला. ओम नमो नारायण, श्री सेवागिरी महाराज की जयच्या नामघोषाने अवघी सुवर्णनगरी दुमदुमली. सेवागिरी महाराजांच्या रथावरचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. आज भल्या पहाटे संजीवन समाधीस मठाधिपती सुंदरगिरी महाराजांच्या हस्ते विधीवत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर विविध मान्यवरांच्या हस्ते रथाचे पुजन करून रथ मार्गस्त झाला.
काल रात्रीपासूनच भाविकांची लगबग चालू झाली होती. पुसेगाव व पंचक्रोशितील महीलांनी पुरण पोळीचा नैवेद्य संजीवन समाधीस दाखवण्यास गर्दी केली होती. शिस्तबद्ध आणि पोलिस प्रशासनाच्या चोख बंदोबस्तामध्ये भाविकांना रथाचे दर्शन दिले जात होते. लाखो भाविकांचे आशास्थान असणार्‍या पुसेगावच्या सेवागिरी महाराजांच्या रथावर नोटांच्या माळा बांधून सुख समृद्धीसाठी मोठ्या मनाने राजा सेवागिरीला मागणे मागताना भाविक समाधानी होत होते. सकाळी विधीवन रथाचे पुजन करून मान्यावरांच्या हस्ते यात्रास्थळावरील श्री सेवागिरी कृषीप्रदशर्नाचा शुभारंभ करण्यात आला.


यावेळी चेअरमन मोहनराव जाधव, खासदार श्रीनिवास पाटील, खा. रणजीतसिंह निंबाळकर, प्रा.नितिन बानगुडे पाटील, आ. महेश शिंदे, आ. जयकुमार गोरे, शशिकांत शिंदे, चंद्रकांत दळवी, विश्वस्त, डॉ.सुरेश जाधव, रणधिर जाधव, प्रताप जाधव, योगेश देशमुख, सुरेश जाधव, सरपंच मनिषा पाटोळे, यांच्यासह अनेक मान्यवर आणि भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
ग्रामोध्दारचा विशेषांक श्री सेवागिरी समाधीस अर्पण
आज श्री सेवागिरी महाराजांच्या रथोत्सवा निमित्ताने दैनिक ग्रामोध्दारच्या वतीने श्री सेवागिरी विशेषांक प्रकाशित करण्यात आला होता. सेवागिरी महाराजांचे परम भक्त आप्पासाहेब जाधव बारामती यांच्या हस्ते आणि पत्रकार विशाल सुर्यवंशी यांच्या उपस्थित सेवागिरी महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आला. ग्रामोध्दारच्या या विशेषांकाचे भाविकांकडून कौतुक होत होते

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular