पुसेसावळी: पुणे जिल्ह्यातील कासुर्डीचे माजी सरपंच संतोष कोंडे यांच्यावतीने खटाव तालुक्यातील विविध गावातील शाळांमधून गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे मोफत वाटप करण्यात आले.
पुणे जिल्हा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश बापू कोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष कोंडे यांनी शालेय गरजू विद्यार्थ्यासाठी हा उपक्रम सुरु केला आहे.जयरामस्वामींचे वडगाव येथील नितीन भोसले व चिंचणी(अं)येथील विजय पाटील यांच्या पुढाकाराने सुमारे 100 दप्तर वितरण पुसेसावळी, राजाचे कुर्ले, चोराडे, गिरीजाशंकरवाडी तसेच हिंगणगाव बुद्रुक(जि.सांगली) येथील विद्यार्थ्यांना झाला.
ठिकठिकाणी झालेल्या या कार्यक्रमास नितीन भोसले, समीर बागवान, सुधीर आळे, अर्चना बिराजदार, मनिषा आपटे, रघुनाथ जगदाळे व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे मोफत वाटप
RELATED ARTICLES