रहिमतपूर: रहिमतपूर (ता.कोरेगांव) येथे महिंद्रा पिकअप व बलेनो कारची समोरासमोर धडक होवून कारचालकाचा जागीच मृत्यू झाला असल्याची फिर्याद धामणेरचे पोलीस पाटील जयवंत विठ्ल क्षीरसागर यांनी नोंदविली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, बुधवार, दि.8 मे रोजी दुपारी 1.45 वाजण्याच्या सुमारास रहिमतपूर गावच्या हद्दीत हॉटेल रानमळाजवळ रहिमतपूर ते सातारा जाणार्या रोडवर रहिमतपूर बाजूने बलेनो कार (क्र.एम.एच. -11-सीजी- 6782) चे चालक ज्ञानदेव रामचंद्र चिंचकर (रा.भाग्योदय नगर वडूज, ता. खटाव) व सातारा बाजू मिहिंद्रा पिकअप (क्रमांक एम.एच.11- सीएच- 9001) चे चालक अविनाश लक्ष्मण केंजळे (रा. कठापूर, ता.कोरेगांव) यांच्या गाड्यांची समोरासमोर धडक होवून बलेनो कार चालक ज्ञानदेव चिंचकर हे या अपघात जागीच मयत झाले.
महिंद्रा पिकअप चालक अविनाश केंजळे (वय 40) जखमी झालेले आहेत. या अपघताची नोंद रहिमतपूर पोलीस ठाण्यात जाली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार विजय जाधव हे करीत आहेत.
दरम्यान बलेनो कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कारच्या दोन्ही एअर बॅग उघडून सुद्दा ज्ञानदेव चिंचकर हे या अपघातातून बचावले नाहीत. ते सध्या श्रीराम विद्यामंदीर येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते.
रहिमतपूर येथील अपघातात कारचालक जागीच ठार
RELATED ARTICLES