रहिमतपूर: न्हावी बु।्। (ता.कोरेगाव) येथील रुपेश चंद्रकांत डोईफोडे (वय 22) यांचे अंदमान निकोबार येथे कर्तव्य बजावत असताना आजारी पडल्याने निधन झाले. त्यांचे पार्थिव रात्री न्हावी बुद्रुक गावात आणण्यात आले. त्याचे पार्थिव पाहून बहिण, वडिल, आजी आजोबा व नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. सारा गाव शोकाकूल झाला. गावातील, परिसरातील नागरिक व युवकांनी त्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. साडे सात वाजता फुलांनी सजविलेल्या ट्रॉलीतून त्यांच्या पार्थिवाची गावातून मिरवणूक काढण्यात आली. शेकडो ग्रामस्थ व महिलांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. साडे आठ वाजता गावातील स्मशानभूमीत हजारो लोकांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी इंडियन नेव्हीचे मेजर चिफ ऑफिसर अनिल शेळके, इंडियन नेव्हीचे जवान, महाराष्ट्र बटालियनचे साताराचे सुभेदार धनाजी देसाई, जिल्हा सैनिकी वेलफेअर ऑफिसर चंद्रकांत पवार, आय एन एस चे आंग्रे मुंबई चे कमांडर वरंदू गोस्वामी, रहिमतपूरचे स. पो. नि. घनशाम बल्लाळ, गटविकास अधिकारी सावंत मॅडम यांसह मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली. यावेळी इंडियन नेव्ही जवानांनी त्यांना अखेरची मानवंदना दिली.
यावळी सावंत मॅडम, जिल्हा परिषद सदस्य भिमराव पाटील, सरपंच प्रियांका माने, उपसरपंच बाळकृष्ण सुर्वे रहिमतपूरच्या ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य बी डी साळुंखे, एनसीसी प्रमुख उदयराज माने, शिक्षक वर्ग, रहिमतपूर येथील ज्युनियर कॉलेजचे व सरदार बाबासाहेब माने महाविद्यालयाचे एन.सी.सी. कॅडेट यासह रहिमतपूर पंचक्रोशीतील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
रुपेश डोईफोडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
RELATED ARTICLES