Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीजिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिन साजरा

जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिन साजरा

सातारा: जिल्हाधिकारी कार्यालयात आज सद्भावना दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचार्‍यांना सद्भावना दिनाची प्रतिज्ञा दिली.
मी अशी प्रतिज्ञा करतो/करते की, मी जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करीन. मी आणखी अशी प्रतिज्ञा करतो/करते की, आमच्यामधील वैयक्तिक किंवा सामुहिक स्वरुपाचे सर्व प्रकारचे मतभेद मी हिंसाचाराचा अवलंब न करता विचार विनियम करुन व संविधानिक मार्गानी सोडवीन,अशी प्रतिज्ञा यावेळी देण्यात आली. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular