Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीरविवारी सातार्‍यात हिल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन वाहतूक व पार्किंग व्यवस्थेत तात्पुरते बदल

रविवारी सातार्‍यात हिल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन वाहतूक व पार्किंग व्यवस्थेत तात्पुरते बदल

सातारा: दि.25 ऑगस्ट रोजी सातारा शहरामध्ये सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही स्पर्धा पोलीस परेड ग्राऊंड- कालीदास पंप-शिवाजी सर्कल-पोलीस मुख्यालया मार्गे शेटे चौक- पोलीस-कमानी हौद- मोती चौक – गोलबाग – समर्थ मंदिर – बोगदा – हॉटेल निवांत – प्रकृती हिल रिसोर्ट – गणेश खिंड- त्याच मार्गाने परत येऊन टोपे मामा मंदिर-गुरुवार बाग – शाहु चौक – वाहतूक शाखा – सावंत कॉर्नर – गिते बिल्डिंग – शिवाजी सर्कल ते पोलीस परेड ग्राउंड अशी होणार आहे. या स्पर्धेमध्ये सुमारे 8 हजार स्पर्धक भाग घेणार आहेत. प्रोत्साहन देण्याकरीता मोठया प्रमाणात नागरीकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. तरी स्पर्धक व नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सातारा शहरातील अंतर्गत वाहतुकीचे नियमन व वाहनांचे पार्किंग करणे जरुरीचे असलेने पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 34 अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारान्वये 25 ऑगस्ट रोजीच्या पहाटे 4 ते सकाळी 11 वा.पर्यंत हिल मॅरेथॉन स्पर्धेकरीता सातारा शहरातील अंतर्गत वाहतूक सुरळीत राहणेकामी वाहतूक व पार्किंग व्यवस्थेत खालील प्रमाणे तात्पुरते बदल केले आहेत.
दैनंदिन वाहतूकीचे बंदी घालण्यात येणारे मार्ग :- जुना आर.टी.ओ.चौक-पोलीस परेड ग्राऊंड-शिवाजी सर्कल-आ.के.बॅटरी-शेटे चौक-कमानी हौद-मोती चौक-गोलबाग-समर्थ मंदिर-बोगदा-हॉटेल निवांत-प्रकृती हिल रिसोर्ट -गणेश खिंड- त्याचमार्गान परत येऊन टोपे मामा मंदिर-गुरुवार बाग-शाहु चौक-वाहतूक शाखा-सावंत कॉर्नर-गिते बिल्डिंग-शिवाजी सर्कल हा मार्ग रुग्णवाहिका, पोलीस वाहने, अग्निशामक दलाची वाहने वगळून सर्व वाहनांना प्रवेश बंद राहिल. 2) शेटे चौक ते मोती चौक तसेच मोती चौक ते राधिका टॉकिज चौक ते राधिका सिग्नल- एस.टी.स्टॅन्ड-भूविकास बँक हा मार्ग वाहतूकीसाठी खुला राहिल.
मॅरेथॉन वाहतूक मार्गातील बदल :- शिवराज पेट्रोल पंप, अंजठा चौक व गोडोली मार्गे पोवईनाका बाजूकडे येणारी सर्व वाहने बॉम्बे रेस्टॉरन्ट चौक-वाढे फाटा-भुविकास बॅक मार्गे सातारा शहरात ये-जा करतील. बॉम्बे रेस्टॉरंन्ट चौकातून पोवईनाका बाजूकडे येणारी सर्व वाहने वाढे फाटा-भुविकास बॅकमार्गे सातारा शहरात ये-जा करतील.
मुख्य बसस्थानक-राधिका सिंग्नल-तहसिल कार्यालय मार्गे राष्ट्रीय महामार्ग कडे जाणारी सर्व वाहने ही भूविकास बँक-जुना आर.टी.ओ चौक-जरंडेश्वर नाका वाढे फाटा मार्गे सातारा शहराच्या बाहेर जातील. सज्जनगड,ठोसेघर,परळी कडून येणारी -जाणारी सर्व वाहने ही भुविकास बॅक-जुना आर.टी.ओ चौक-जरंडेश्वर नाका-वाढे फाटा-शेंद्रे मार्गे ये-जा करतील. कास बाजूकडून सातारा शहर बाजूकडे येणारी वाहने मॅरेथॉन स्पर्धा संपेपर्यंत सातारा बाजूकडे येणार नाहीत किंवा पर्यायी मार्गाने सातारा शहराकडे येतील.
पार्किंग :- हिल मॅरेथॉन स्पर्धेकरीता येणार्‍या स्पर्धकांनी व नागरीकांनी आपली वाहने ही प्रशासकिय इमारतीचे समोरील मोकळया मैदानामध्ये लावावीत. यशवंतराव चव्हाण कॉलेज सातारा येथील पार्किंगच्या कळ्या जागेत वाहने पार्क करावीत. जिल्हाधिकारी कार्यालय ते बांधकाम भवन या मार्गावर रोडच्या बाजला रोडला समातर वाहन पार्किग करावीत. वाहतूकीतील बदलाची नागरिकांनी व वाहन चालकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन व्ही. एस.शेलार, सहायक पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण शाखा, सातारा शहर यांनी केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular