Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडी‘स्पर्धात्मक युगातही अजिंक्यतारा सूत गिरणीची कामगिरी उल्लेखनिय’

‘स्पर्धात्मक युगातही अजिंक्यतारा सूत गिरणीची कामगिरी उल्लेखनिय’

सातारा: सभासदांनी अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणी व्यवस्थापनावर दाखविलेल्या विश्‍वासामुळे व व्यवस्थापनाच्या अचुक नियोजन व काटकसरीच्या धोरणामुळे आपली सूत गिरणी सुस्थितीत चालली आहे. आजच्या परिस्थीतीमध्ये आपण विविध प्रकारचे सूत निर्माण करत असल्याने गिरणी चांगल्याप्रकारे वाटचाल करत आहे. सहकारी सूत गिरणी व्यवसायाशी संबंधीत अनेक अडचणींवर यशस्वीपणे मात करुन अजिंक्यतारा सूत गिरणी स्पर्धात्मक युगात टिकून आहे. ही बाब गिरणीच्या दृष्टीने कौतुकास्पद असून गिरणीची कामगिरी उल्लेखनिय आहे, असे गौरवोद्गार श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी काढले.
वळसे ता. सातारा येथील अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीची 29 वी वार्षिक साधारण सभा गिरणी कार्यस्थळावर खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाली. याप्रसंगी सौ. वेदांतिकाराजे बोलत होत्या. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन उत्तमराव विठोबा नावडकर होते. यावेळी गिरणीचे सर्व संचालक, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, संचालक अनंता वाघमारे, अजिंक्य बझारचे चेअरमन यशवंत साळुंखे, अजिंक्य बझारचे संचालक प्रकाश नाईक, अजिंक्यतारा सहकारी कृषि औंद्योगिक ऊस तोडणी व वाहतूक संस्थेचे चेअरमन बाळकृष्ण ङ्गडतरे, सातारा जिल्हा खरेदी विक्री संघाचे चेअरमन अ‍ॅड. सुर्यकांत धनवडे, अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीचे माजी संचालक भानुदास मोहिते, किशोर घाडगे, अजिंक्यतारा साखर कारखान्याचे माजी चेअरमन रामचंद्र जगदाळे, माजी व्हा.चेअरमन दिलीप निंबाळकर, माजी संचालक सुरेश कदम, थोराजी ढाणे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
सौ. वेदांतिकाराजे म्हणाल्या की, सध्यस्थितीत कापसाचे वाढलेले दर व सूताचे दर यामध्ये मोठ्या प्रमाणात तङ्गावत असल्यामुळे देशातील बर्‍याच सूत गिरण्या आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. तसेच देशांतर्गत मंदीचे सावट वस्त्रोद्योग व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर आलेले आहे. तरी प्रतिकुल परिस्थीत आपल्या सूत गिरणीमध्ये बाजारपेठेच्या मागणीप्रमाणे विविध प्रकारचे सूत निर्मीती करण्यासाठी अत्याधुनिक तसेच तांत्रिक दृष्टया सक्षम अशा परदेशी मशिनरी खरेदी करून गिरणीमध्ये कार्डेड कॉम्प्यॅक्ट, कोम्बड व स्लब अशा उच्चतम सूताची निर्मिती केली जात आहे.
सभेच्या प्रारंभी स्व.श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले (भाऊसाहेब महाराजसाहेब) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर गिरणीचे चेअरमन उत्तमराव नावडकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संजय कुलकर्णी यांनी श्रध्दांजली ठराव वाचन केले आणि चीङ्ग अकौंटंट मानसिंग पवार यांनी नोटीस वाचन करून अजेंड्यावरील सर्व विषय मंजूरीसाठी सादर केले. त्यास सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मंजूरी दिली. संचालक जगन्नाथ किर्दत यांनी आभार मानले. याप्रसंगी गिरणीचे सर्व सभासद, व अधिकारी प्रॉडक्शन मॅनेजर शैलेश जानकर, मिल इंजिनीयर प्रदीप राणे, एच आर मॅनेजर राजेश दिक्षीत, कर्मचारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular