Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीउदयनराजे भोसले यांनी प्रचाराचे रणशिंग फुंकले

उदयनराजे भोसले यांनी प्रचाराचे रणशिंग फुंकले

सातारा: सातारा लोकसभेच्या पोटनिवडणूकीत भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी प्रचाराचे रणशिंग फुंकले. आपण एकत्रितपणे व जवाबदारीने काम करून ही लोकसभेची लढाई नक्की जिंकू, विधानसभेच्या लढाईसाठी सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे असे आवाहन उदयनराजे भोसले यांनी केले. येथील दैवज्ञ मंगल कार्यालयात भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुकाप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, पदाधिकारी यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कराड दक्षिण चे भाजप नेते व पंढरपूर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष अतुल भोसले, भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, माजी आमदार डॉ दिलीप येळगावकरमहिला आघाडीच्या अध्यक्षा कविता कचरे, सुवर्णा पाटील, सातारा पालिकेतील भाजप गटनेत्या सिध्दी पवार, दत्ताजी थोरात, नगरसेवक धनंजय जांभळे, विजय काटवटे, आशा पंडित प्राची शहाणे, मिलिंद काकडे, विट्ठल बलशेटवार, सुनील काटकर अ‍ॅड दत्तात्रय बनकर, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
उदयनराजे पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मला तुम्हा सर्वांचे सहकार्य हवे आहे. नकळतपणे जर कुणाला काही बोललो असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. मी छत्रपती घराण्यात जन्मलो हे माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. खरे छत्रपती दोनच छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज. या समाजकारणाच्या लढाईत मला तुमची साथ हवी आहे. खर्‍या अर्थाने ही निवडणूक तुमचीच आहे. लोकसभा व विधानसभा या दोन्ही निवडणुका जवाबदारीने व एकदिलाने लढूया असे आवाहन उदयनराजे यांनी केले. उदयनराजे यांच्या पक्षप्रवेशाने सातारा जिल्ह्यात भाजपची ताकत प्रचंड वाढली आहे. त्यांच्यासाठी आपण राजकीय ताकत पणाला लावून त्यांना पुन्हा एकदा चांगल्या मताधिक्क्याने निवडून आणू असे आवाहन अतुल भोसले यांनी केले. भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते कोणत्याही क्षणी निवडणुकीला तयार असतात व भाजप पदाधिकारी सतत पक्ष वाढीचे काम करतात लोकसभेसह जिल्हयातील सर्व जागा निवडून देण्याचे आवाहन विक्रम पावसकर यांनी केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular