सातारा: जावली तालुक्याला कधीही विकासासाठी निधी कमी पडू दिला नसून,कायम झुकते माप दिले आहे. विकास ही सदैव चालणारी प्रक्रिया असल्याने सत्तेत राहून विकासकामे अधिक गतिमान करणे गरजेचे आहे. सत्तेशिवाय मोठमोठ्या विकासकामांना निधी मिळत नाही आणि निधी शिवाय विकास नाही,ही सत्य परिस्थिती आहे. आगामी काळातही जावळी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कायम प्राधान्य देऊ, अशी ग्वाही भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्षाचे सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
जावली तालुक्यातील म्हसवे जिल्हा परिषद गटामध्ये प्रचार दौर्या दरम्यान कोपरासभा, बैठका व प्रचार पदयात्रेप्रसंगी शिवेंद्रसिंहराजे बोलत होते.यावेळी शिवेंद्रसिंहराजे यांनी विभागातील कार्यकर्त्यांसह आखाडे,सनपाने,आंबेघर,करहर आदी गावांमध्ये दौरा करून ग्रामस्थांशी संवादही साधला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जावलीचे माजी सभापती सुहासदादा गिरी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बुवासाहेब पिसाळ, सौरभ शिंदे, माजी सभापती सौ अरुणा शिर्केआदी मान्यवरांसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
देशात व राज्यातला विचार करून लोकांनी भाजपाला साथ धावी. सातारा-जावलीत कमळ फुलल्यास विकासकामे अधिक गतीने होतील, हा माझा आणि सर्वांचा विश्वास आहे. या विभागातील अनेक गांवात विकासकामे होऊन सुविधाही परिपूर्ण केल्या आहेत. गावोगावी पिण्याच्या पाण्याची सोय,मंदिर, सभामंडप, शेतीसाठी जलसंधारण, उत्कृष्ट रस्ते आदी कामे मार्गी लावली आहेत. तसेच कारखान्याच्या माध्यमातून उसालाही चांगला भाऊ देऊन बिल ही वेळेत अदा केले आहे. येथील उर्वरित विकास कामांसाठी सदैव कटिबद्ध राहू आणि संपूर्ण जावली तालुक्याचा कायापालट करू असे आश्वासन शिवेंद्रसिंहराजे यांनी दिले.
मानकुमारे, सुहास गिरी, बुवासाहेब पिसाळ यांनीही मनोगत व्यक्त करून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार बोलून दाखवला. सयाजी शिंदे यांनी प्रास्ताविक केले. ज्ञानेश्वर शेलार यांनी आभार मानले. माजी उपसभापती हणमंत पार्टे, रवी परामने, मछिंद्र मुळीक, विकास धोंडे, यशवंत पवार, संजय शिर्के, संदीप परामने, सरपंच सरिता शेलार, ज्ञानेश्वर शेलार, अजय शिर्के, जयदीप शिंदे, यशवंत पवार, समिर शेलार, प्रदीप शिंदे यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यक्रर्ते आणि ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जावलीच्या विकासाला कायम प्राधान्य देऊ:शिवेंद्रसिंहराजे भोसले
RELATED ARTICLES