Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीठोसेघर, सज्जनगड पर्यटकांनी हाऊसफुल्ल

ठोसेघर, सज्जनगड पर्यटकांनी हाऊसफुल्ल

परळी : सातारा तालुक्याच्या पश्चिमेकडे जोरदार पाऊस झाल्याने ठोसेघर धबधब्यासह परिसरातील धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. डोंगररांगा हिरवळल्या असून मंगळवारी दसरा निमित्त सुट्टी असल्याने ठोसेघर, सज्जनगड पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले होते. कासला फुलांचा हंगाम सुरूझाल्याने पर्यटकांनी तेथेही गर्दी केली होती.
जिल्ह्यात झालेल्या पावसाच्या तुलनेत सातार्‍याच्या पश्चिमेला पडलेल्या पावसाने डोंगररांगाचे रुपडे पालटले आहे. परळी खोरे हिरवाईने नटले आहे. त्यामुळे तरुणाईसह पर्यटकांची पावले या दिशेने वळू लागली आहेत, कास ठोसेघरसह भांबवली वजराई, बामणेवाडी, केळवली, सांडवली हे धबधब्यासह परिसरातील छोटे-मोठे धबधबे पाहण्यास गर्दी करू लागले आहेत.
ठोसेघर धबधबाही धो-धो कोसळत असल्याने पर्यटक गर्दी करत आहेत. सज्जनगड येथेही मंगळवारी श्री समर्थ रामदास स्वामीच्यापादुकांच्या दर्शनासाठी भविकासह पर्यटकांनी गर्दी केली होती. त्यामुळे भातखळे पासून ते सज्जनगड फाटा या तीन किलोमीटरच्या मार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. सातारा जिल्ह्यात निसर्ग सौंदर्यात नटलेल्या ठिकाणाकडे तरुणाईचा ओघ दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
कास,बामणोली,अजिंक्यतारासह विविध ठिकाणचे धबधबे पाहण्यासाठी वतेथे भिजण्यासाठी तरुणाईची गर्दी होत आहे. ठिकठिकाणच्या रस्त्यावरील डोंगर कपारीत कोसळणारे छोटे-मोठे धबधबे आकर्षित करू लागले आहेत. त्यातच आता कास पठाराप्रमाणे ठोसेघर, भांबवली येथे फुले आल्याने त्याठिकाणी पर्यटक गर्दी करत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular