सातारा: महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण व कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड समाजभूषण पुरस्कार प्रदान करून गौरविलेल्या श्री जानाई मळाई शिक्षण संस्था साताराचा 31 वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न झाला.
संस्था वर्धापनदिनानिमित्त संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, जायगांव (ता.कोरेगांव), न्यू इंग्लिश स्कूल कुसवडे (ता. जि. सातारा), न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल कुसवडे ता. जि. सातारा. लोकमान्य प्रशाला चिखली ता.जि. सातारा या शाखांमध्ये स्वच्छता, मतदान जागृती, रक्तदान, अवयवदान या विषयांवर सामाजिक प्रबोधन फेरी काढण्यात आली. या फेरींना ग्रामस्थांनी मोठया संख्येने उपस्थित राहून सहभाग दर्शविला.संस्थेची मुख्य शाखा असलेल्या लोकमान्य विद्यामंदिर व श्री.छ.प्रतापसिंह महारज राजेभोसले माध्यमिक विद्यालय, माने कॉलनी, देगांवरोड, एम.आय.डी.सी. सातारा या शाळेत संस्थेचे पदाधिकारी, संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष दलितमित्र शिवराम माने (गुरूजी) संस्थेच्या सर्व शाखांतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन कमिटी पदाधिकारी, संस्थाहितचितंक यांच्या उपस्थितीत स्नेहमेळावा घेण्यात आला. यावेळी संस्थेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन कमिटी सदस्य, संस्थेचे संचालक, संस्थाहितचिंतक, संस्थापक-अध्यक्ष यांची समयोचित मनोगते झाली. याप्रसंगी संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल जायगांव शाळेतील विद्यार्थी विरेंद्र कदम इ. 8 वी याने 3000 मीटर धावणे शालेय स्पर्धेमध्ये तालूकास्तरावर व्दितीय क्रमांक मिळवून यश मिळविलेबदद्ल तसेच श्री. छ. प्रतापसिंहमहाराज राजेभासले माध्यमिक विद्यालय सातारा शाळेतील विद्यार्थी सुधांशू जावळे इ. 10 वी याने विभागीय कराटे स्पर्धेत गोल्ड मिडल मिळवून तसेच कु. स्नेहा गायकवाड इ. 9 वी या विद्यार्थीनीने तालूकास्तर शालेय कराटे स्पर्धेत यश मिळवून संस्थेचा नावलौकिक वाढविल्याबदद्ल त्यांचा संस्थापक अध्यक्ष दलितमित्र श्री शिवराम माने (गुरूजी) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कराड मर्चंड को ऑफ सोसायटी कराड शाखा सातारा यांच्या मार्फत संस्थेस भेट दिलेल्या 12 डस्टबीनचा स्विकार संस्थापक अध्यक्ष यांनी केला.
कार्यक्रमास संस्थेचे संचालक निर्मलसिंग बन्सल, डी.टी.जाधव, वासंती माने, चंद्रहार माने सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन कमिटी सदस्य, संस्थेचे हितचिंतक उपस्थित होते. सूत्रसंचालन कु. वैशाली भिसे यांनी प्रास्ताविक दत्तात्रय काळे व आभार अक्षय माने यांनी मानले.
श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेचा वर्धापनदिन उत्साहात
RELATED ARTICLES