Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडी‘खात्रीशीर उत्पनाचा मार्ग म्हणजे ग्रीन हाऊसमधील ऑर्किड लागवड’

‘खात्रीशीर उत्पनाचा मार्ग म्हणजे ग्रीन हाऊसमधील ऑर्किड लागवड’

सातारा: सातारा जिल्हा बँकेच्या आदर्शवत कामकाजामुळे देश व परदेशातील सहकारी बँकींग व सहकार क्षेत्रातील अनेक तज्ञांनी या बँकेस भेटी दिल्या आहेत. सहकारी बँकिंग व कृषि क्षेत्रातील आणि अत्याधुनिक तंत्राचे ज्ञान प्राप्त होणेसाठी, जिल्हयाच्या कृषी विकासासाठी बँकेमार्फत परदेश अभ्यास दौर्‍याचे नियोजन करून जिल्ह्यातील शेतकर्‍याला केंद्रस्थानी ठेवून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी बँकेने अनेक महत्वपूर्ण योजना यशस्वीपणे राबविलेल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून बँकेच्या संचालक मंडळाच्या वतीने थायलंड येथील प्रादेशिक निर्यात संचालक केरातीकुल सोफानसरी (गोल्फ) यांना निमंत्रित केले होते.
आजपर्यंत महाराष्ट्र शासन, नाबार्ड, नॅफस्कॉब, राज्य बँक, महारास्ट्र स्टेट को. ऑप बँक्स असोसिएशन तसेच देशातील इतर नामांकित संस्थांकडून विविध 82 पुरस्काराने बँकेस गौरविणेत आले आहे. यावेळी केरातीकुल सोफनसरी (गोल्फ) म्हणाले, ग्रीन हाऊसमध्ये ऑर्किडची लागवड केल्यास, नियमित पिकांना पर्याय म्हणून खात्रीचे उत्पन्न देणेसाठी सर्वोत्तम पर्याय होऊ शकतो. थायलंड देशातून जगभरातील जवळपास 40 हून अधिक देशांना ऑर्किडची निर्यात केली जाते. श्री गोल्फ यांनी जिल्हा बँकेचे विशेष कौतुक करून, बँकेचे कामकाज थायलंड देशातील बँकांना मार्गदर्शक ठरेल असे सांगितले.
आंतरराष्ट्रीय कृषी तज्ञ भरत भोजने यांनी स्ट्राबेरी लागण रोपांची आयात, उत्पादन वाढ व प्रक्रिया संदर्भात विस्तृत विवेचन करून सातारा जिल्ह्यामध्ये अमेरिकेतून आयात होणार्‍या स्ट्राबेरी रोपांची किंमत कमी कशी करता येईल व जिल्ह्यातील शेतकर्‍यांना याचा जास्तीत जास्त फायदा होणेचे दृष्टीने लवकरच सातारा जिल्हा बँकेत चर्चासत्र आयोजित करीत असलेचे सांगितले.
संचालक प्रकाश बडेकर म्हणाले, बँकेचे संचालक मंडळ धोरण ठरविणे शिवाय इतर कोणत्याही कामकाजामध्ये हस्तक्षेप करीत नाही. विविध धोरणे ठरविताना शेतकर्‍याला केंद्रस्थानी ठेवून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी विचार केला जातो.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, पंचतारांकीत हॉटेलांतली सजावट असो किंवा घरगुती सामाजिक कार्यक्रम, शुभेच्छांसाठी दिले जाणारे बुके असोत.प्रत्येक ठिकाणी ऑर्किडच्या फुलांचा सर्रास वापर केला जातो. ऑर्किड लागवडीसाठी शेतकरी सभासदांनी कर्ज मागणी केलेस बँक या कारणासाठी कर्ज उपलब्ध करून देईल. तरी शेतकरी सभासदांनी ऑर्किडची लागवड करून, खात्रीशीर उत्पन्नाचा मार्ग निवडावा असे आवाहन डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले.सरव्यवस्थापक राजीव गाढवे यांनी प्रास्ताविकामध्ये ऑर्किड लागवडीमुळे जिल्हयातील शेतकर्‍यांच्या मानसिकतेमध्ये बदल होवून व्यावसाईक शेतीमुळे त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावणेस मदत होईल असे सांगितले. यावेळी सरव्यवस्थापक, राजेंद्र भिलारे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
याप्रसंगी, बँकेचे व्यवस्थापक, उपव्यवस्थापक व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular