Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीशहरातील रखडलेली सर्व कामे गतीने पूर्ण होतील : वेदांतिकाराजे भोसले

शहरातील रखडलेली सर्व कामे गतीने पूर्ण होतील : वेदांतिकाराजे भोसले

सातारा: विकास ही कायम चालणारी प्रक्रीया आहे. सातारा शहरात दोन्ही राजेंच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. ग्रेड सेपरेटर, कास धरण उंचीवाढ, छत्रपती शिवाजी संग्रहालय अशी अनेक महत्वकांक्षी कामे युध्दपातळीवर सुरु आहेत. सातार्‍यातील मेडीकल कॉलेज, सज्जनगड रोप वे, अजिंक्यतारा किल्ल्यावर शिवसृष्टी उभारणे, महाराष्ट्र स्कूटर्सचा प्लांट सुरु करणे, एमआयडीसीमध्ये मेगा प्रोजेक्ट आणणे आणि बेरोजगारीला आळा घालणे ही कामे आगामी काळात दोन्ही राजांच्या माध्यमतून होणार असून त्यासाठी भाजपच्या कमळाला बहुमतांनी विजयी करणे आवश्यक आहे. दोन्ही राजे सातारकरांच्या आशिर्वादाने मताधिक्य मिळवतील आणि सातारा शहरातील रखडलेली सर्व कामे गतीने पुर्ण होतील, असा विश्‍वास श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी व्यक्त केला.
ङ्गुटका तलाव आणि गितांजली शाळा (रविवार पेठ) याठिकाणी शनिवारी भारतीय जनता पार्टी, शिवसेना व मित्रपक्ष महायुतीचे सातारा लोकसभा पोटनिवडणूकीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छ. उदयनराजे भोसले आणि सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत सौ. वेदांतिकाराजे बोलत होत्या. सभेस उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, नगरसेवक अशोक मोने, श्रीकांत आंबेकर, स्मिता घोडके, राजू भोसले, सुजत राजेमहाडीक, सविता ङ्गाळके, धनंजय जांभळे, अमोल मोहिते, प्राची शहाणे, प्रवीण पाटील, बाळासाहेब शिंदे, सुनेशा शहा, सागर साळुंखे, दत्ताजी थोरात, प्रकाश बडेकर, बलभिम शिंगरे, योगेश चोरगे, सोमनाथ पाटोळे, नजमा बागवान, कल्याण राक्षे, हेमांगी जोशी, अशोक जाधव, सुरश अंबवले आदी मान्यवर उपस्थित होते.
आजपर्यंत दोन्ही राजेंच्या माध्यमातून सातारा शहरात विविध विकासकामे मार्गी लागली आहेत. कास धरणाची उंची, ग्रेड सेपरेटर, रस्त्यांसाठी 50 कोटी निधी, सातारा- जावली मतदारसंघात रस्त्यांचे जाळे, अनेक ठिकाणी रिंगरोडची कामे, मेढा भाग कुसुंबी मार्गे कोयना विभागाला जोडला. आरोग्य केंद्रे, व्यायमाशाळा, अंगणवाड्या, कास पठार, ठोसेघर, वजराई धबधबा, आदीच्या माध्यमातून पर्यटनवाढ, उरमोडी धरणासह कालवे आणि मतदारसंघात असंख्य बंधारे बांधून जलक्रांती असा चौङ्गेर विकास शिवेंद्रराजेंच्या माध्यमातून झाला आहे. शहरात सर्व प्रकारच्या शिक्षणाची सोय आहे.
आता मेडीकल कॉलेज होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अजिंक्यतारा किल्ल्यावर शिवसृृष्टी, नवीन मोठमोठ्या कंपन्या सातार्‍यात आणणे, यासारखी मोठी कामे करायची असतील तर, सत्तेशिवाय पर्याय नाही. आपल्या दोन राजांच्या आणि भाजपच्या माध्यमातूनच शहराचा गतीने विकास होणार आहे. त्यामुळे निवडणूकीपुरत्या उगवणार्‍या भूछत्रांच्य भूलथांपाना न भूलता दोन्ही राजांना विजयी करुन आपल्या सातारा शहराचा कायापालट करुया, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे यांनी यावेळी केले.
यावेळी प्रकाश बडेकर, नजमा बागवान, शरद काटकर, सोमनाथ पाटोळे, श्रीकांत आंबेकर, सुनेशा शहा, हेमांगी जोशी आदींनी मनोगत व्यक्त करुन दोन्ही राजे ङ्गक्त गतिमान विकासासाठी भाजमध्ये गेल्याचे स्पष्ट करुन दोघांनाही मताधिक्य देण्याचे आवाहन केले. राम यांनी आभार मानले. दोन्ही कोपरा सभांना युवक, युवती, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular