Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीमतदानाच्या 48 तास अगोदर इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियावर प्रचार करण्यास बंदी

मतदानाच्या 48 तास अगोदर इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियावर प्रचार करण्यास बंदी

सातारा: मतदानाच्या 48 तास अगोदर इलेक्ट्रॉनिक तसेच सोशल मीडियावर प्रचार करण्यास बंदी आहे. मतदानाच्या एक दिवस अगोदर तसेच मतदानाच्या दिवशी म्हणजेच 21 ऑक्टोबर रोजी वृत्तपत्रात उमेदवारांना जाहिराती देता येतील. या जाहिराती माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीकडून प्रमाणित करुन घेणे बंधनकारक आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत.
वृत्तपत्रात देण्यात येणार्‍या जाहिराती भडकावू, गैरसमज पसरविणार्‍या किंवा द्वेष पसरविणार्‍या नसु नयेत. या सर्व बाबी वेळोवेळी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना, वर्तमानपत्रांना सांगण्यात आलेल्या आहेत. मतदानाच्या पूर्वी 48 तास अगोदर इलेट्रॉनिक तसेच सोशल मीडियावर प्रचार करण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातलेली आहे, याचे काटेकोरपणे पालन करावे. जिल्हा माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती यावर विशेष लक्ष देणार आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular