सातारा(अजित जगताप): सातारा लोकसभा पोट निवडणुक व सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सातारा येथे सभेच्या पीठावर सेना-आर. पी. आय. नेत्यांची प्रतिमा गायब करून त्यांच्या समर्थकांना डिवचण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सातारा सैनिक स्कूल येथील मैदानात गेली आठवडाभर जोरदार तयारी करण्यात आली होती. कोणतीही कसूर ठेवली नव्हती. प्रत्येक वेळी भाजप महायुतीचे उमेदवार असा उल्लेख करण्यात आला होता. उमेदवारांच्या सह भाजप राष्ट्रीय व प्रदेश अध्यक्ष आणि मान्यवरांचे फोटो लावले होते पण, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, आर. पी. आय. राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, रा. स. प. चे महादेव जानकर यांचे फोटो लावण्यात आले नव्हते. त्यामुळे त्या पक्षाचे निष्ठावंत शिवसैनिक, कार्यकर्ते उपस्थित असूनही नाराज दिसत होते.
भाजप पक्षाचे माजी आमदार डॉ दिलीप येळगावकर,माण-खटावचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांना काँग्रेसचे माजी आमदार व भाजप उमेदवार यांचे काम न केल्याने निलंबन केले आहे. ही बाब सुद्धा अनेकांना खटकली आहे. त्याचा ही परिणाम सातारा जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात होणार आहे.
सातारा जिल्ह्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणते विचार मांडणार आहेत. याकडे सर्वांचे लक्ष लागले असून राज्यातील विविध भागात त्याचा परिणाम होणार आहे.
सातारा जिल्हावासीयांना पंतप्रधान मोदी हे लक्षात राहावे अशी व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांची संख्या लक्षणीय दिसून आल्याने भाजप महिला आघाडी अध्यक्ष गीताताई लोखंडे, दत्ताजी थोरात यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.
सातार्यातील महाजनादेश संकल्प सभेला सेना-आर.पी.आय. नेत्यांच्या प्रतिमा गायब
RELATED ARTICLES

