Thursday, October 16, 2025
Homeठळक घडामोडीपाटणकरांच्या वाड्यावर शंभूराज यांची विराट सांगता सभा

पाटणकरांच्या वाड्यावर शंभूराज यांची विराट सांगता सभा

सातारा: 2014 साली दिलेल्या आश्वासनांची आणि विकासकामांची गेली पाच वर्षात पूर्तता करूनच जनतेच्या दारांत मते मागायला आलो आहे.ज्याप्रमाणे 2014 च्या निवडणुकीत पाटण मतदार संघाने भरघोस मताधिक्य देऊन संपूर्ण सातारा जिल्ह्यात नंबर एक चे मतदान मला दिले आता त्याही पेक्षा अधिक वेगाने या पाटण मतदारसंघाचा विकास करण्यासाठी केवळ सातारा जिल्ह्यातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात नंबर एक चे मतदान मला देण्यासाठी सज्ज राहा असे आवाहन पाटण विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार शंभूराज देसाई यांनी केले.
आमदार शंभूराज देसाई पाटण येथे महायुतीच्या प्रचार सभेच्या विराट सांगता सभेत उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना बोलत होते.यावेळी श्रीमती विजयादेवी देसाई, यशराज देसाई, रविराज देसाई, सौ.स्मितादेवी देसाई, सौ.अस्मितादेवी देसाई, ईश्वरी देसाई,जयराज देसाई, आदित्यराज देसाई,सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर,जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती यु टी माने,शिवसेना जिल्हाप्रमुख जयंवतराव शेलार,पाटणचे नगरसेवक सागर माने,भैय्यासाहेब पाटणकर,प्रकाश पाटील,जि.प.सदस्य प्रदीप पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यांची प्रमुख उपास्थिती होती.
यावेळी आमदार देसाई म्हणाले,2014 मध्ये मी पाटण मतदार संघातील विकासाचे सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्य देणार असे आवाहन केले होते आणि त्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद देऊन तुम्ही संपूर्ण सातारा जिल्ह्यात नंबर एक चे मतदान केले आणि आपल्या सर्वांच्या विश्वासावर पाटण मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यात मला यश आले आणि गेल्या पाच वर्षात पाटण मतदार संघासाठी तब्बल 1806 कोटी रुपयांची विकासकामे मंजूर केली.एवढ्या मोठ्या प्रमाणातील विकासकामे ही मरळी, किंवा सातारा येथील कोयना दौलत मध्ये बसून होत नाहीत तर त्यासाठी विधिमंडळात भांडावे लागते,बोलावे लागते प्रसंगी संघर्ष करावा लागतो केवळ मागच्या बाकांवर बसून डुलक्या घेऊन किंवा व्यासपीठावर बसून डुलक्या घेऊन एवढा विकास होत नाही असा जोरदार टोला माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर आणि त्यांचे पुत्र सत्यजितसिंह पाटणकर यांना त्यांनी लगावला.
दरम्यान राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी आपल्या मल्हारपेठ येथील भाषणात आमदार देसाई यांच्यावर केलेल्या वैयक्तिक आरोपासंदर्भात आमदार देसाई यांनी शरद पवार यांचे नाव न घेता राष्ट्रीय नेते म्हणून त्यांनी अत्यंत संयमाने प्रतिउत्तर दिले.यावेळी आमदार देसाई म्हणाले, साहेब,आजारपण कुणाला सांगून येत नाही.ते ना तुमच्या हातात आहे ना आमच्या. साहेब मी जरूर आजारी होतो मला डेंग्यू चा ताप झाला होता…मला सलाईन ही लावली होती…मात्र तरीही मी पाटण मतदार संघात महापूर सदृश्य परिस्थिती झाली असताना स्वतः पुराच्या पाण्यात शिरलो,जेसीबी मध्ये बसून पलीकडील पूरग्रस्त लोकांना धीर दिला मदतीचा हात दिला मात्र आपण ज्याच्या प्रचारासाठी आला होता ते युवा नेते महापूर परिस्थितीत या तालुक्यातच नव्हे तर या देशात ही नव्हते .मी आजारी होतो मात्र हे युवा नेते ऐन पुरपरिस्थितीत का पळून गेले होते याचे उत्तर प्रथम द्या आणि मग कुणासाठी पवार साहेब मते मागताय ते जनतेला सांगा. असा टोला देऊन आमदार देसाई यांनी
विक्रमबाबा पाटणकर म्हणाले,आमदार शंभूराज देसाई हे खर्‍या अर्थाने कर्तृत्वान आमदार असून त्यांच्यामुळेच संपूर्ण सातारा जिल्ह्यात सर्वाधिक विकासाची कामे एकट्या पाटण मतदारसंघात अवतरली आहेत याचा खर्‍या अर्थाने पाटण मतदारसंघाला अभिमान आहे. त्यांचा विजय तोही महविजय आता निश्चीतच आहे. विरोधकांच्याच नाकर्तेपणामुळे पाटण तालुक्यातील जनतेच्या मानेवर व्याघ्र प्रकल्पाचे भूत बसविले.मात्र आमदार शंभूराज देसाई आणि आम्ही वेळोवेळी लढा दिला.
या प्रकल्पातील जमिनी शेतकर्‍यांच्या नावावर होण्यासाठी आमदार देसाई यांनी केलेल्या प्रामाणिक प्रयत्न केला आहे.असे सांगून छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर नाहक टीका करून विरोधकांनी त्यांची बदनामी केल्याचे ही त्यांनी सांगितले त्यामुळे येत्या 21 तारखेला आमदार देसाई आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांनाच प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन पाटणकर यांनी केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular