सातारा : महिला दिनाचे औचित्य साधून नूतन पोलीस अधिक्षक तेजस्वीनी सातपुते यांचा जिल्हा महिला काँग्रेसतर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्षा धनश्री महाडीक यांनी सर्व महिलांच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन नूतन जिल्हा अधिक्षक तेजस्वी सातपुते यांचे अभिनंदन केले व महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनीही सर्व महिला पदाधिकार्यांना 8 मार्च महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. व महिलांच्या कोणत्ंयाही अडीअडचणीला, समस्यांना सर्वतोपरी, प्राधान्याने सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
यावेळी जिल्हाध्यक्षा धनश्री महाडीक, प्रदेश प्रतिनिधी रजनीताई पवार, अध्यक्षा नम्रता उत्तेकर, सातारा तालुका अध्यक्षा माधुरी जाधव, शहर अध्यक्षा रजिया शेख, जिल्हा उपाध्यक्षा मालन परळकर, सरचिटणीस मंजिरी पानवे, सारीका हिरवे, शोभा गोळे, अॅड. वंदना कराडे, शिंदेताई व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा महिला काँग्रेसतर्फे पोलीस अधिक्षक सातपुते यांचा सत्कार
RELATED ARTICLES