Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीपदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी नोंदणी करा

पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी नोंदणी करा

सातारा: मुख्य निवडणूक अधिकारी,महाराष्ट्र राज्य,मंबई यांच्या पत्रान्वये पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणी कायक्रम घोषित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पदवीधर व शिक्षक मतदारांना कळविण्यात येते की, जून 2020 मध्ये होणार्‍या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीची मतदार नोंदणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या 6 नोव्हेंबर 2019 पर्यंत मतदार नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे मतदारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून सातारा येथील तहसिलदार कार्यालयातील निवडणूक शाखेत सादर करावेत, असे आवाहन पदनिर्देशित अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी केले आहे.
उपविभागीय अधिकारी, मिनाज मल्ला यांनी सर्व विभागप्रमुखांच्या बैठकीत मतदार नोंदणीचा आढावा घेतला. त्यावेळी तहसिलदार, सातारा,जावली, मुख्याधिकारी न.पा.सातारा, गटविकास अधिकारी,पंचायत समिती,सातारा,मेढा, सहाय्यक गटविकास अधिकारी,पंचायत समिती, सातारा, मेढा, वरिष्ठ पोस्ट मास्तर, सातारा, प्राचार्य, आयटीआय, सातारा, प्राचार्य, एल.बी.एस.कॉलेज, सातारा, प्राचार्या, सावित्रीबाई फुले कॉलेज, सातारा, प्राचार्या, डी.जी. कॉलेज, सातारा,उपप्राचार्य, सर्व शासकीय विभागप्रमुख तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी यांनी मतदार नोंदणीबाबतची माहिती दिली. तसेच नमुना फॉर्म-18 व फॉर्म-19 वाटप करण्यात येवून 6 नोव्हेंबरपर्यंत निवडणूक शाखा, तहसील कार्यालय, सातारा येथे जमा करण्याबाबतच्या सूचना दिल्या. आता मतदार नोंदणीची मुदत अंतिम टप्प्यात आली असल्याने प्रशासनाने जास्तीत जास्त मतदारांना नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.
पदवीधर मतदारांनी विहित नमुन्यातील अर्जासोबत दि. 01 नोव्हेंबर 2016 या अर्हता दिनांकापूर्वीचे पदवी अथवा पदविका प्रमाणपत्र, छायाचित्र व रहिवासी पुरावा जोडणे आवश्यक आहे.
तसेच पदवी प्रमाणपत्र हे राजपत्रित अधिकारी यांनी साक्षांकीत करणे आवश्यक आहे. शिक्षक मतदारांनी त्यांचा अर्जासोबत दि.01 नोव्हेंबर 2013 ते दि.01 नोव्हेंबर 2016 या कालावधीत तीन वर्षे सलग अथवा टप्प्याटप्प्या सेवा बजावल्याबाबतचा पुरावा म्हणून संबंधित मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular