सातारा: भोसे फाटा, ता. कोरेगाव येथे मंगळवारी रात्री चालत जात असताना दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की शामराव रामचंद्र कांबळे ( वय 22) रा. रुई, ता. कोरेगाव हे मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास भोसे फाटा येथे चालत जात असताना दुचाकीने त्यांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात जखमी झाले. त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत ्
आसलेजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक
सातारा: आसले, ता. वाई गावच्या हद्दीत दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना घडली. जखमी झालेले जमदाडे ते पोलिस मुख्यालयात पोलीस कर्मचारी म्हणून काम करतात.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की योगेश मोहन जमदाडे (वय 33) रा. सोमजाई नगर, बावधन रोड, वाई ते पोलीस मुख्यालयामध्ये पोलीस कर्मचारी म्हणून काम पाहतात. आज सकाळी कर्तव्य बजावण्यासाठी दुचाकीवरून येत असताना 10.45 वाजण्याच्या सुमारास आसले गावच्या हद्दीत समोरून आलेल्या दुसर्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे त्यात ते जखमी झाले. त्यांच्यावर वाई येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दत्तनगर येथे ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक
सातारा: दत्तनगर, ता. सातारा येथे ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की नारायण प्रकाश बर्गे ( वय 38) रा. चिंचणेर वंदन सातारा हा आज बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सातारा येथून चिंचणेर वंदन कडे दुचाकीवरुन जात असताना दत्त नगर, ता. सातारा येथे त्याच्या दुचाकीला अज्ञात ट्रॅव्हल्सने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तो जखमी झाला.
त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुचाकीस्वाराची कारला धडक
सातारा: सातारा शहर परिसरात दुचाकीस्वाराने मोरुन येणार्या कारला धडक दिल्याने झालेल्या अपघात तो जखमी झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की किरण सतीश भोसले (वय 29) रा. वनगळ, ता. सातारा हा आज दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास जरंडेश्वर नाका येथून जुना आरटीओ चौक येथे दुचाकीवरुन जात असताना समोरून आलेल्या कारला दुचाकीने धडक देऊन झालेल्या अपघातात जखमी झाला. त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुलीने केले विषारी औषध प्राशन
सातारा: शेतामध्ये काम करून दिल्याच्या कारणावरून एका 15 वर्षीय मुलीने विषारी औषध प्राशन केल्याची घटना अंबवडे बुद्रुक, ता. सातारा येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अंबवडे बुद्रुक, ता सातारा येथील एका 15 वर्षीय मुलीने आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास शेतामध्ये काम करू न दिल्याच्या कारणावरून विषारी औषध प्राशन केल्याने तिच्या वडिलांनी तिला येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
भोसे फाटा येथे अपघात एक जखमी
RELATED ARTICLES

