सातारा : राष्ट्रीय स्तरावरील खेलो इंडिया स्पर्धेत धावण्यामध्ये सुवर्ण पदकांची लयलूट करणारी सातारा एक्सप्रेस सुदेष्णा हणमंत शिवणकर हिची पदके पटकावण्याची घोडदौड सुरुच असून आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे झालेल्या 35 व्या नॅशनल ज्युनिअर ऍथलेटिक चॅम्पियनशीप 2019 या राष्ट्रीय स्पर्धेत ती ब्रांझ पथकाची मानकरी ठरली आहे. या यशाने तिची निवड आता गुवाहाटी आसाम येथे होणार्या खेलो इंडिया स्पर्धेसाठी सलग दुसर्यांदा निवड झाली आहे.
दि.2 ते 6 नोव्हेंबर कालावधीत आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे 35 वी नॅशनल ज्युनिअर ऍथलेटिक चॅम्पियनशीप राष्ट्रीय स्पर्धा झाली. या स्पर्धेत सातारा एक्सप्रेस सुदेष्णा शिवणकरहिने 100 मीटर धावणे क्रिडा प्रकारात मुलींच्या 18 वर्ष वयोगटात ब्रांझ मेडल मिळवून यश संपादन केले आहे.
या यशामुळे तिची 11 जानेवारी 2020 मध्ये गुवाहाटी आसाम येथे होणार्या खेलो इंडीया स्पर्धेसाठी सलग दुसर्यांदा निवड झाली आहे. 200 मीटर स्पर्धामध्ये ही सुदेष्णाने अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. या राष्ट्रीय स्पर्धामध्ये 100 व 200 मीटर धावणे प्रकारात आंतराष्ट्रीय स्पर्धा खेळलेल्या महिला खेळाडूंचे आव्हान परतवत सुदेष्णाने पदक मिळविण्यामध्ये सातत्य राखले आहे.
सुदेष्णा शिवणकर ही सातार्यातील यशवंतराव चव्हाण सायन्स महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून पोलीस दलातील हणमंत शिवणकर यांची ती कन्या आहे. आपल्या वडिलांच्या प्रोत्साहन व तालुका क्रीडा अधिकारी बळवंत बाबर व सायन्स कॉलेजमधील प्रशिक्षक गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली तिने पदके पटकावण्याची यशस्वी वाटचाल कायम ठेवली आहे. सुदेष्णाच्या खेळातील कामगिरीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असून या पोलीस कन्येवर सातार्यातील क्रीडा क्षेत्रासह मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सुदेष्णा शिवणकर राष्ट्रीय स्पर्धेत ब्रांझ पथकाची मानकरी
RELATED ARTICLES

