Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीमामाचा काटा भाच्यानेच काढला

मामाचा काटा भाच्यानेच काढला

सातारा: सातारा-पुणे महामार्गालगत लिंबखिंड गावच्या हद्दीत एका परप्रांतीय व्यक्तीचा धारदार शस्त्राने खून झाला अशी माहिती रवीवारी मध्यरात्री उशिरा घडली असल्याची समोर आली होती. ही घटना सोमवारी सकाळी समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.
रामसुंदर सिंह (रा. बिहार) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव होते. खून झाल्याची घटना समोर आल्यानंतर सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. प्राथमिक माहितीनुसार तो तेथे कामगार असून भांडणातून ही घटना घडली असावी असे देखील समोर आले होते.
मात्र पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा काही तासांतच लावला आहे. मामा सतत शरीर सुखाची मागणी करायचा तसेच मामाची शरीर सुखाची मागणी अनेक वेळा भागवली. मात्र मामाची मागणी वारंवार वाढू लागल्याने पिडीताने मामाला मासाला ठेचायच्या उकळीनेच डोके ठेचले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान खून करून करून पळून जाण्याच्या तयारीत असणार्‍या संशियीत भाच्याला लोणावाळ्यात सातारा तालूका पोलिस व पुणे रेल्वे पोलिस यांच्या संयुक्तपथकाने अटक केली आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular