Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीसोशल मिडीयाद्वारे प्रचारासाठी राजकीय पक्षांना प्रमाणपत्राची आवश्यकता : श्‍वेता सिंघल

सोशल मिडीयाद्वारे प्रचारासाठी राजकीय पक्षांना प्रमाणपत्राची आवश्यकता : श्‍वेता सिंघल

सातारा व माढा लोकसभा मतदारसंघात 23 रोजी मतदान
सातारा : सातारा आणि माढा मतदार संघात लोकसभेसाठी 23 मार्च 2019 रोजी तिसर्‍या टप्प्यात होणार आहे. संवेदनशील मतदार संघांवर व्हिडीओग्राफी, सीसी टीव्ही आणि वेबकास्टींग करण्यात येणार आहे. प्रसार माध्यमांमधून आचार संहितेचे उल्लंघन रोखण्यासाठी जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणपत्र नियंत्रण केंद्र उभारण्यात येणार आहे. सोशल मिडीयाद्वारे प्रचारासाठी प्रमाणपत्राची आवश्यकता निवडणूक काळात प्रसारमाध्यमांवरून चुकीची माहिती प्रसारित होऊ नये व अफवांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने महत्वाचे पाऊल उचलेले आहे. त्यानुसार राजकीय पक्षांना फेसबुक, ट्वीटर, युट्यूब, व्हाट्सअप आदी सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रचार साहित्य प्रसारित करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून गठीत करण्यात आलेल्या सोशल मिडीया प्रमाणपत्र नियंत्रण केंद्राचे प्रमाणपत्र घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. असे प्रमाणपत्र नसल्यास सोशल मिडीयावरून प्रचारास बंदी असून, नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे, असे माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्‍वेता सिंघल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2019 कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार निवडणूक अधिसूचना गुरुवार दि. 28 मार्च 2016 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दि. गुरुवार 4 एप्रिल 2019, नानिदेशन पत्रे छाननी शुक्रवार दि. 5 एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. तसेच उमेदवारांनी अर्ज मागे घेण्यात अंतिम दिनांक सोमवार दि. 8 एप्रिल2019 असा असणार आहे. मंगळवार दि.23 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे. दि. 23 मे 2019 रोजी मतमोजणी होणार आहे. तसेच निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दि. 27 मे 2019 असा असणार आहे, असेही श्वेता सिंघल यांनी सांगितले.
आचार संहितेच्या अनुषंगाने सर्व शासकीय मालमत्तांच्या भिंतीवरील लेखन, पोस्टर्स, पेपर्स, टाऊट, होर्डींग, बॅनरर्स, झंडे काढून टाकण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात येत आहे. तसेच खासगी मालमत्तेवरील सर्व अनधिकृत राजकीय जाहिराती निवडणूक जाहिर झाल्यापासून काढून टाकण्याची कार्यवाही त्वरीत करण्यात येत आहे. राजकीय पक्ष, उमेदवार किंवा अन्य निवडणुकांचा प्रचार, प्रसार अधवा निवडणुकांसंबंधी कामकाजासाठी शासकीय वाहनाचा उपयोग करण्यासाठी संपूर्ण बंदी करण्याबाबत कार्यवाही करण्यात
आली आहे. तसेच निवडणूक जाहिर झाल्यानंतर सार्वजनिक निधीच्या खर्चावर जाहिरात करण्यात येणार्‍या सर्व प्रकारच्या जाहिरातीं तात्काळ बंद करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. शासकीय संकेतस्थळावरुन राजकीय कार्यकत्यांचे फोटो तात्काळ काढून टाकण्याबाबत सर्व संबंधित विभागांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. दारु, रोकडे, प्रतिबंधीत औषधे यांची सखोल तपासणी राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे करण्यात येणार आहे. तसेच तक्रार देखरेख यंत्रणा कार्यान्वीत करण्यात येणार आहे. निवडणूक विषयक प्रमुख घडामोडींची जाहिरात करण्यात येणार असून जाहिराती आकाशवाणी, टीव्ही, सिनेमागृहे, शासकीय वाहिन्या यांच्यावरुन गतदार जागृती साम्रगीचे प्रसार करण्यात येणार आहे. असल्याचेही श्वेता सिंघल यांनी यावेळी सांगितले.
आचार संहिता काळात असे असणार नियम निवडणूक काळात आचार संहितेचे काटेकोर पालन करण्याचे आदेश असून उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सांगितले आहे. निवडणूक प्रचार काळात रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत प्रचारासाठी ध्वनीक्षेपकावर बंदी घालण्यात आली आहे. तर पर्यावरण पुरक प्रचार साहित्य व माध्यमांचा उपयोग करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेस जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती तेजश्री सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular