सातारा: लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख, पाटण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, महाराष्ट्र विधानसभेतील उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचा 53 वा वाढदिवस रविवार दि.17 नोव्हेंबर,2019 रोजी दौलतनगर ता.पाटण येथे मोठया दिमाखात साजरा होत असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई वाढदिवस नियोजन समिती यांचेकडून प्रसिध्दीपत्रकाव्दारे देण्यात आली असून वाढदिवसानिमित्त आमदार शंभूराज देसाईंना शुभेच्छा देण्याकरीता येणार्या हितचिंतक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पहार अथवा हारतुरे न आणता तालुक्यातील गरीब कुटुंबातील मुलामुलींना वाढदिवसाची भेट देण्याकरीता वहया तसेच शालेय वस्तू आणाव्यात असे आवाहनही नियोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
पत्रकांत म्हंटले आहे की,उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचा 53 वा वाढदिवस रविवार दि.17 नोव्हेंबर,2019 रोजी दौलतनगर ता.पाटण येथे मोठया दिमाखात साजरा होत असून या दिवशी दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन कारखाना कार्यस्थळ, दौलतनगर येथे करण्यात आला आहे.सकाळी 09.00 वा.त्यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त कुटुंबियांच्या वतीने औक्षण झालेनंतर सकाळी 09.00 ते 11.00 पर्यंत ते कारखाना कार्यस्थळावरील श्री गणेश मंदीरामध्ये गणेश दर्शन करुन मरळी येथे ग्रामदैवत निनाईदेवीचे दर्शन झालेनंतर ग्रामपंचायत व ग्रामस्थ मरळी यांच्यावतीने सत्कार व अभिष्टचिंतन स्विकारणार आहेत.त्यानंतर कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या पुतळा,स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांची समाधी व पुर्णाकृती पुतळयास व लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयास पुष्पचक्र अपर्ण व विनम्र अभिवादन असे धार्मिक कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहेत.त्यानंतर हिंदुहदयसम्राट शिवसेना प्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांचे सातव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने त्यांना विनम्र अभिवादन व पुण्यस्मरण दिनानिमित्त गरीब कुटुंबातील महिलांना संसारपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात येणार आहे.शिवदैालत बँकेच्या विस्तारीत कक्षाचे 16 व्या वर्धापनदिन समारंभास उपस्थित राहणार आहेत त्यानंतर त्यांचे निवासस्थानी शिवविजय हॉल येथे आगमन झालेनंतर या परिसरातील प्राथमिक शाळेतील तसेच अंगणवाडीतील लहान मुलांना खाऊवाटप व शालेय साहित्यांचे वाटप करुन लहान मुलांच्या हस्ते आकाशात फुगे सोडण्याचा कार्यक्रम आयोजीत केला आहे.त्यानंतर स.11.00 पासून दुपारी 04.00 वाजेपर्यंत आमदार शंभूराज देसाई हे वाढदिवसानिमित्त कार्येकर्ते, हितचिंतक व आम जनतेच्यावतीने निवासस्थानी शिवविजय हॉल येथे शुभेच्छा स्विकारणार आहेत.दुपारी 04.00 वा त्यांच्या वाढदिवसानिमित्त दौलत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये सन 2019 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेने मोठया मताधिक्क्याने आमदार शंभूराज देसाईंना निवडून देवून विजयाची हॅक्ट्रीक साधल्याबद्दल आमदार हॅट्रीक विजयी महासभा पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने आयोजीत केली आहे. या विजयी महासभेला संबोधित करण्याकरीता आमदार शंभूराज देसाई उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 07.30 वा.आतिष बाजी व रात्री 09.00 वा. श्री.गणेश सांस्कृतिक मंडळ ,दौलतनगर यांचेवतीने आयोजित करते तुम्हा मुजरा हा मराठी लावण्यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.आमदार शंभूराज देसाई हे या दिवशी दिवसभर शुभेच्छा स्विकारण्यासाठी दौलतनगर ता.पाटण येथे उपस्थित राहणार आहेत,याची हितचिंतकांनी नोंद घ्यावी तसेच शुभेच्छा देण्यासाठी हार-तुरे,पुष्पगुच्छ व पुष्पहार न आणता शालेय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे पेन,वहया इ.शालेय साहित्य आणावे असे आवाहन मान्यवर मंडळीसह तालुक्यातील पदाधिकारी, हितचिंतक,कार्यकर्ते यांना करण्यात येत असून पाटण मतदारसंघातील आम जनतेने कारखान्याचे सभासद, हितचिंतक, कार्येकर्ते यांनी आपल्या मतदार संघाचे लाडके आमदार शंभूराज देसाई यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त व आयोजित आमदार हॅट्रीक विजयी महासभेला बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही आमदार शंभूराज देसाई वाढदिवस नियोजन समितीच्या वतीने पत्रकाव्दारे करण्यात आले आहे.
आमदार देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
RELATED ARTICLES