सातारा: जकातवाडी (ता. सातारा) येथील एका महिलेचा उपचार सुरु असताना प्रतिभा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सौ. प्रतिक्षा सचिन माने (वय 23) रा. जकातवाडी, ता. सातारा असे या मृत महिलेचे नाव आहे.
तिला दि.19 रोजी बाळंतपणासाठी गोडोलीतील साई नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे सिझर करुन प्रसुती झाली. त्यानंतर ती अत्यावस्थ झाल्याने तिच्यावर अतितातडीची उपचार पध्दती करण्यात आली व प्रतिभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाल्याची खबर डॉ.संजय साठे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली. अकस्मात मृत्यू म्हणून याबाबत नोंद झाली असून पोलीस हवालदार देसाई या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
प्रसुतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा मृत्यू
RELATED ARTICLES

