सातारा: साग लाकडाची बदली वाहतूक करण्यासंदर्भात बदली पास मिळवण्यासाठी वनपाल शंकर जगन्नाथ आवळे रा.रघुनाथपुरा पेठ करंजे सातारा यांनी तक्रारदार यांच्याकडे 20हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली परंतु तडजोडी अंती ती रक्कम 14,000 रुपये ठरवण्यात आली. लाचेची रक्कम स्वीकारताना वनपाल शंकर आवळे त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांचा किरकोळ वखारीचा व्यवसाय असून त्यांच्याकडे असलेल्या साग या लाकडाचे मालाची बदली वाहतूक पास दिल्याच्या मोबदल्यात आरोपीने 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली परंतु तडजोडी अंती 14 हजार रुपयांमध्ये हा व्यवहार ठरवण्यात आला. त्यानंतर वनपाल आवळे यांनी ही रक्कम स्वीकारताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. यातील तक्रारदार यांचा किरकोळ वखारीचा व्यवसाय असून त्यांच्याकडे असलेल्या साग या लाकडाचे मालाचा बदली वाहतूक पास दिल्याच्या मोबदल्यात आरोपीने लाचेची मागणी करून ती स्वीकारली असता रंगेहात पकडण्यात आले. सदर कारवाई पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के, संजय साळूखे, संभाजी काटकर, विशाल खरात, तुषार भोसले लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांनी पोलीस अधीक्षक लाप्रवि पुणे राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक,लाप्रवि पुणे श्रीमती सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य वनसंरक्षक,(प्रादेशिक),कोल्हापूर त्यांच्यासमोरचे करण्यात आली.
20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना वनपाल जाळ्यात
RELATED ARTICLES

