सातारा : (अजित जगताप) सध्याचा जमाना हा फॅशनचा आहे. त्यामुळे फॅशनचे कपडे परिधान करून रस्त्यावरून निघालेला मुलगा की मुलगी ? हे समजणे कठीण झालेले आहे. पुर्वी थोरल्या भावाला कपडे अपुरे पडले की धाकट्या भावाला ते घालण्यास सोपे पडावे या साठी जुन्या काळातील कारागीर ते कपडे कमी- जास्त करुन देत होते. गरीबांना तेवढाच खर्च वाचल्याचे सामाधान वाटत होते. पण आधुनिक युगात आता जुन्यापेक्षा नव्या कपड्यालाच अल्टरच्या टाक्याची गरज भासू लागली आहे.असे सर्वत्र चित्र दिसत आहे.
सातारा शहरातील पोवई नाक्यावरील आल्टर टेलर म्हणजे दिपक कांबळे हे त्याबाबत प्रसिद्ध झाले असून दररोज किमान शँभर नवीन शर्ट व पॅट हे कपडे आल्टर करण्यासाठी त्यांच्याकडे येत असतात.झगमगाट दुनियामध्ये आपण प्रवाहाबरोबर आहोत हे दाखवून देण्यासाठी तरुणाई आता पुढे आली आहे. काहींना शंभर रुपये कमवण्याची अक्कल नसली तरी आपणही इतरांसारखे कपडे वापरतो हे दाखवून देण्यासाठी महागडे कपडे पाालकांना विकत घ्यायला भाग पडतात. पाल्याच्या हौशे पोटी अशी कपडे पालक कर्ज बाजारी होऊन सुध्दा विकत घेतात आणि दुकानाच्या बाहेर येताच पाल्य ही कपडे आल्टर करण्यासाठी आल्टर टेलरकडे म्हणजे दिपक कांबळे कडे घेवून जातात. त्यावेळी पालकांचेे चेहरे आपली नाराजी लपवू शकत नाही पण ,जेव्हा आल्टर टेलरचा मशिनवर कपड्याचे आल्टर केले जाते. त्यावेळी पाल्याच्या चेहर्यावरील समाधान अनेक पालकांची नाराजी दुर करण्यात यशस्वी ठरते हे अनुभवले आहे.
सध्या नोकर्या मिळणे अशक्य असताना कोणतेही आरक्षण न घेता त्या परिसरातील मान्यवरांच्या सहकार्याने वाढे ता. सातारा येथील सामाजिक कार्यकर्ते असलेल्या कांबळे यांनी आपल्या उदरनिर्वाहाचा मार्ग शोधला. त्यातूनच आल्टर टेलर म्हणून त्यांनी नाव लौकिक प्राप्त केले आहे.
पोवई नाका ते राजवाडा येथील कपड्याच्या दुकानातील गिर्हाईक कपडे आल्टर करण्यासाठी त्यांच्याकडे येतात. प्रत्येकाच्या आवडी निवडी प्रमाणे व्यवस्थित माप घेवून कपडे आल्टर करुन देतात. काही वेळेला शालेय विद्याथी कपडे घेवून येतात या मध्ये शाळेचा गणवेश, एन, सी, सी, स्काउट गाईड चे गणवेश यांचा समावेश असतो.त्यांना वेळेत कपडे मिळावेत यासाठी इतरांना ते थांबवून ठेवतात. सातार्यातील वसतिगृहातील गरीब विद्यार्थ्यांसाठी ते कमी दरात काम करतात.
चांगला धागा, चैन व आवश्यक वस्तू ते वापरतात. त्यामुळे त्यांच्याकडे नेहमीच ग्राहकांची गर्दी असते. या कामातून पैसे व समाधान ही मिळते असे त्यांनी सांगितले.
फॅशन मुळे जुन्या पेक्षा नव्या कपड्यालाच आल्टरच्या टाक्याची गरज
RELATED ARTICLES