सातारा:(अजित जगताप) महाराष्ट्र राज्यातील शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या मान्यता भ्रष्टाचार निर्मुलन कार्यास यश आले असून सातारा जिल्ह्यातील सतरा शाळेतील शिक्षकांच्या मान्यता रद्द करण्यात आल्या आहेत. शिक्षणाधिकारी सह दोषी शिक्षण संस्थेवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
संपूर्ण राज्यात अनुशेष उल्लंघन करून आर्थिक तडजोडीतून चार हजार पदे भरण्यात आली होती. चार हजार मान्यतेच्या प्रकरणी नोटिसा बजवण्यात येवुन संबधित शिक्षकाचे पगार रोखण्याचे आदेश देण्यात आले.सातारा जिल्हा समाजवादी अध्यापक सभा या संघटनेने माध्यमिक विभागातील राज्यभर चाललेल्या या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. तसेच अनुसूचित जाती व जमाती आयोगाकडे या प्रकरणी चौकशीची मागणी केली होती सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा अधिकारी यांचे कडे निवेदन दिले होते. सातारा जिल्ह्यात दोनशे पाच शिक्षक मान्यता नियम बाह्य करण्यात आल्या आहेत. मात्र, तत्कालीन शिक्षण अधिकारी एम के गोंधळी हेच पुढे कोल्हापूर विभागाचे उपसंचालक असलेने ही चौकशी राज्याचे शिक्षण संचालक नामदेव राव जरग यांना चौकशीचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्या नुसार दि 31मे 2017रोजी त्याचा अहवाल शिक्षण आयुक्त याना सादर केला होता. त्या नुसार अर्जदार शिवाजी राऊत अध्यापक सभेचे जिल्हा प्रमुख व अर्जदार शिवाजी राऊत यांना दि 11 ऑक्टोबर 2019 रोजी जावक संकीर्ण /2016-17/वें मा त माध्य./आस्था/अं/5890 या पत्राने तत्कालीन अधिकारी एम के गोंधळी व देविदास कुल्लाळ यांचे विरुध्य खाते निहाय चौकशी सुरू करण्यात आली होती. तरीही सतरा बेकायदेशीर मान्यता प्राप्त करणार्या सतरा शिक्षकाचे पगार सन 2017 पासून ऑक्टोंबर 2019 अखेर चालू होते राज्याचे शिक्षण आयुक्त किशोर सोळूंकी यांनी त्यांचे कोल्हापूर चे उपसंचालक सत्य वान सोनवणे यांना त्या शिक्षकांची मान्यता रद्द प्रकरणी कारवाई बाबत दि 8नोव्हेंबर2019 मध्ये कळविले होते.
त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील सागर मोहन जाधव न्यू इंग्लिश स्कूल राजापुरी, सातारा मंगेश तुकाराम जाधव कोटेश्वर विद्यालयगोवे सातारा नेताजी पांडुरंग देशमुख क लिपिक छ संभाजी विद्यालय शिवनगर कराड स्वप्ना नारायण ख्रिस्त, उमा विठोबा दळवी, गुळचांड मुरलीधर पळे, स्मिता कृष्णा जाधव, पुष्पा बळवंत जाधव , मेघा श्रीरंग नलवडे सर्व सरस्वती विद्यालय ,कोरेगाव माधुरी राहुल घोरपडे र धो ओसवाल विद्यालय, त्रिपुटी सोमनाथ प्रभाकर सरोकस ,पद्मावती हाय स्कूल वेणेगाव, संदीप बबन जाधव, पद्मावती हा वेणेगाव , पल्लवी साहेबराव गोडसे , टिना दिंगबर जगताप ,छत्रपती शिवाजी विध्यालय , रेणुका सोनबा अहीवले हनुमान विद्यालय, गोखली ,फलटण अंकुश शिवाजी चव्हाण भारत माता विद्यालय मायणी. चंद्रकांत ज्योतिराम, बहिरम हुतात्मा परशुराम विद्यालय, वडूज या शिक्षकांच्या मान्यता रद्द झाल्याने व पगार रोखण्यात आले आहेत. अशी माहिती अर्जदार शिवाजी राऊत यांनी दिली आहे. गेली सात वर्ष याबाबत लढा उभारला होता. अखेर त्याला यश मिळाले आहे.
सातारा जिल्ह्यातील शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराचा गोंघळ घालून अनेकांनी माया कमावली आहे. यामध्ये राजकारणी काही मंडळींनी चांगलेच हात धुवून घेतले असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ज्या शिक्षक व सेवकांकडून पैसे घेऊन त्यांना बेकायदेशीर मान्यता दिली आहे. त्यांनी आता निर्भिडपणे आपली भूमिका मांडली पाहिजे.त्यांना कोणीही वाचवू शकत नाही. असे प्रथम दर्शनी दिसत आहे.
सातार्यातील माध्यमिक शाळेतील सतरा मान्यता रद्द झाल्याने खळबळ
RELATED ARTICLES