सातारा: वर्ल्ड पिस युनिव्हर्सिटी (जर्मनी) यांच्याकडून सातारा येथील पत्रकार संग्राम निकाळजे यांना पत्रकारितेतून केलेल्या समाजसेवेबद्दल डॉक्टर ऑफ सोशल सर्व्हिस ही मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करून गौरवण्यात आले.
संग्राम निकाळजे हे गेली सोळा वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. ऑनलाईन वर्तमानपत्र, न्यूजपोर्टल या संकल्पना कोणाला परिचितही नव्हत्या, तेव्हा त्यांनी सातारा टूडे या नावाने सातार्यात ही संकल्पना रूजवली. अभ्यासू व व्यासंगी पत्रकार म्हणून ते सर्वत्र ओळखले जातात. आक्रमकता व सडेतोडपणा हेही त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य. पत्रकारितेच्या माध्यमातून लोकांच्या विविध प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मानद डॉक्टरेटसाठी त्यांची निवड करण्यात आली.
पाँडिचेरी येथील शेनबागा कॉन्व्होकेशन सेंटर या ठिकाणी झालेल्या भव्य कार्यक्रमात ग्लोबल अॅक्रिडेशन कौन्सिल (फ्रान्स) च्या सदस्य श्रीमती क्रिस्तेला र्हासोमानिया व श्रीमती सेलिया हेब्रिल यांच्या हस्ते ही पदवी निकाळजे यांना प्रदान करण्यात आली. निकाळजे यांच्यासह पाँडिचेरी येथील पत्रकार आर. विजयशंकर यांनाही डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास वर्ल्ड पिस युनिव्हर्सिटीचे (आयपीयु) विभागीय संचालक डॉ. इग्निसोस प्रभू, तमिळनाडू येथील विभागप्रमुख प्रो. डॉ. नाथन रघुनाथन, रजिस्ट्रार डॉ. ए. गोपिकानंदन, सल्लागार डॉ. एम. आंदराजन, सिनेटर डॉ. रश्मी रुमी, डॉ. सुरेश बाबू यांच्यासह जगभरातील मान्यवर उपस्थित होते.
पत्रकार संग्राम निकाळजे यांना ‘डॉक्टर ऑफ सोशल सर्व्हिस’ मानद डॉक्टरेट पदवी प्रदान
RELATED ARTICLES