Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीसातार्‍यात रस्ते सुरक्षिततेसाठी महावॉकथॉन रॅली

सातार्‍यात रस्ते सुरक्षिततेसाठी महावॉकथॉन रॅली

सातारा: सातार्‍यातील वाहतुक व रस्ते सुरक्षिततेसाठी अभिनव उपक्रम राबविणारे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांच्या संकल्पनेतून आज रस्ता सुरक्षा, नो हॉर्न व वाहनचालक जबाबदारी याबाबत जनजागृती करण्यासाठी महावॉकथॉन रॅली काढण्यात आली. या रॅलीला अनेकांनी सहभाग घेवून नियमाचे पालन करत असल्याचे सिध्द करून दाखविले.
आज सकाळी सातार्‍याच्या जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या शुभहस्ते उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सातारा जिल्हा परिषद सैनिक स्कुल मैदान आण्णासाहेब कल्याणी व शिवाजी महाविद्यालय व पुन्हा परिवहन कार्यालय अशी भव्य रॅली काढण्यात आली.या रॅलीमध्ये महाराष्ट्र परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सीएएस, सीएसआर डायरी व शालेय विद्यार्थी तसेच सामाजिक संस्थेने सहभाग घेतला होता. एम एच 11 आता हॉर्न विसरा बंद करा बंद करा हॉर्नबाजी बंद करा, संडे हो या मंडे रोज असे नो हॉर्न डे, नो हॉर्न हवी शांतता, हॉर्न वाजवता तुम्ही बधीर होतो आम्ही. हॉर्नबाजी बंद करा आरोग्याचे रक्षण करा अशी घोषणाबाजी करून रॅलीमधून जनजागृती करण्यात आली.
परिवहन अधिकारी सुधीर चौधरी, बांधकाम विभागाचे अहिरे व इतर कर्मचारी अधिकारी तसेच वाहन चालकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होवून या उपक्रमाला चांगलीच दाद दिली. सातार्‍यातील रस्त्यावर कर्कश आवाजात काही महाभाग हॉर्न वाजवतात.त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना हॉर्न पुरविणार्‍या दुकानदारांना सहआरोपी करावे अशी मागणी सातारकरांनी केली आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular