Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीअनिल जठार यांची जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदी निवड

अनिल जठार यांची जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदी निवड

सातारा: सातारा जिल्हयाची अर्थवाहिनी असलेल्या जनता सहकारी बँक लि. साताराच्या सेवक संचालकपदी अनिल मधुकर जठार यांची बिनविरोध निवड झाली. बँकेच्या मुख्य कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
याप्रसंगी बँकेचे भागधारक पॅनेलचे प्रमुख व माजी चेअरमन विनोद कुलकर्णी यांच्याहस्ते, बँकेचे चेअरमन अतुल जाधव, व्हाईस चेअरमन बाळासाहेब गोसावी, माजी चेअरमन व विद्यमान संचालक माधव सारडा, वजीर नदाफ, निमंत्रित संचालक अजित साळुंखे व संचालक मंडळाच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
विनोद कुलकर्णी यांनी अनिल जठार यांचे बँकेच्या सेवेतील केलेल्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढून त्यांच्या बँकेतील चांगल्या कामकाजाची दखल वेळोवेळी संचालक मंडळाने घेतली. त्यांनी शिपाई सेवक ते सिनियर ऑफिसर अशी प्रगती साधली असल्याचे विशद केले तर आज संचालक मंडळावर निवड झाल्यामुळे ते सर्वांचे अभिनंदनास पात्र असल्याचे सांगून त्यांना भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जनता बँक कर्मचारी संघाचे अध्यक्ष राजाराम ऊर्फ डॅनी पवार, माजी सेवक संचालक उमेश पाटील, उपव्यवस्थापक मच्छिंद्र जगदाळे यांनीही त्यांना भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. अनिल जठार यांनी सर्वांच्या सहकार्यामुळेच मला हे यश प्राप्त झाल्याचे सांगून सर्वांना सहकार्याबद्दल धन्यवाद दिले. याप्रसंगी बँकेचे अधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होता.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular