सातारा: सातार्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेला 6 डिसेंबर रोजी 122 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त शाळेच्या प्रांगणात सायंकाळी 6 ते 8 या वेळेत स्मृती गंध हा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती शाळा समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले, डेक्कन एज्युकेशन सोसायटीने सातार्यात दि. 6 डिसेंबर 1899 रोजी दिवाणाची पागा येथे न्यू इंग्लिश स्कूलची मुहूर्तमेढ रोवली. (कै) सीतारामपंत देवधर यांच्या कार्यकाळात 37 विद्यार्थ्यांवर ही शाळा सुरू झाली. आज शाळेत 2134 विद्यार्थी असून विविध क्षेत्रात कार्यरत असणार्या विद्यार्थ्यांनी शाळेचा लौकिक उंचावला आहे.सव्वाशे वर्षापूर्वीच्या भक्कम दगडी शाळेत ज्ञानदानाचे काम आजही निष्ठेने सुरू आहे . ज्या शाळेत आपण शिकलो, खेळलो, बागडलो, घडलो त्या शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा स्मृती गंध माजी विद्यार्थी स्नेहमेळावा शाळेच्या प्रांगणात 6 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत होणार आहे. 1993-94 च्या बॅचने या या कार्यक्रमाचे यजमानपद स्वीकारले असून काही ह्रदय सत्कार व विद्यार्थ्याची शाळेविषयीची भावनिक मनोगते, गप्पा व गाणी असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे . या मेळाव्यास जास्तीत जास्त विद्याथ्र्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अमित कुलकर्णी यांनी केले . मुख्याध्यापक सुनिल शिवले, माधव सारडा, डॉ पल्लवी दळवी, अमोल कुलकर्णी, रोहिणी कुलकर्णी, सत्यजित मोरे, व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते .
न्यू इंग्लिश स्कूलचा शुक्रवारी सातार्यात स्मृतीगंध सोहळा
RELATED ARTICLES

