Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीराष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त शासनाच्या विविध योजनांचे सातारा बसस्थानकात स्टॉल

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त शासनाच्या विविध योजनांचे सातारा बसस्थानकात स्टॉल

सातारा : 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासन आणि ग्राहक पंचायतीच्यावतीने सातारा बसस्थानकात विविध विभागांच्या योजनांचे स्टॉल लावण्यासाठी योग्य ते नियोजन जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कार्यालयाने करावे, असे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दिले.
ग्राहक दिनाच्या पूर्वतयारी आढावा बैठक आयोजित केली होती. त्यावेळी श्री. शिंदे बोलत होते. या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे, संबंधित विभागाचे अधिकारी,ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यासाठी सातारा बसस्थानकात अन्न व औषध प्रशासन, वैधमापन शास्त्र विभाग, दुरसंचारविभाग, एलआयसी, कृषि विभाग जिल्हा खरेदीविक्री संघ, गॅस एजन्सीज, महावितरण, बँक, उपप्रादेशिक परिवहन विभाग, राज्य परिवहन विभाग, नगरपालिका तसेच तहसिलदार कार्यालयाने आपल्या कार्यालयाकडून राबविण्यात योजनांच्या माहितीचे स्टॉल उभारावेत. ग्राहकांनी विचारलेल्या विविध तक्रारींचे निराकरण करावे, असे जिल्हा प्रशासनातर्फे यावेळी सांगण्यात आले. ग्राहक दिनी अधिकाधिक नागरिकांनी या स्टॉलला भेटी देऊन लोककल्याणकारी योजना जाणून घ्याव्यात, असे आवानही शिंदे यांनी यावेळी केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular